जि. प. हायस्कुल कावराबांध येथील विद्यार्थ्यांनी गिरवले आरोग्याचे धडे

636 Views

 

प्रतिनिधी।

सालेकसा। सालेकसा तालुक्यातील कावराबांध येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र कावराबांध येथे भेट देऊन आरोग्याचे धडे घेतले. समग्र शिक्षा अभियान अंतर्गत आरोग्य संबंधी इंटरंशिप कार्यक्रम 2020-21 अंतर्गत जि प कनिष्ठ महाविद्यालय कावराबांध च्या विद्यार्थ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र कावराबांध येथे भेट देऊन विविध आरोग्य संबंधी बाबींची प्रात्यक्षिक करून रुग्णालयाचे संपूर्ण कारभार कसे चालते याचा अभ्यास केला.

हे एक दिवशीय कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य ओ. एस. गुप्ता यांच्या मार्गदर्शनात सुशील ब्राह्मणकर तसेच डॉक्टर रामटेके, डॉ. बंसोड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. यात विविध रक्त चाचण्या, प्रशासकीय कामकाजाचे, शस्त्रक्रिया अशा विविध बाबींचा विद्यार्थ्यांनी सखोल अभ्यास केला. या एक दिवसीय कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणकोणत्या सुविधा दिल्या जातात, तसेच कोणत्या विविध रक्त चाचण्या केल्या जातात यासंबंधीही माहिती घेतली. रुग्णालयात आवश्यक अशा विविध प्रशासकीय बाबींचाही त्यांनी अभ्यास केला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य ओ. एस. गुप्ता, वैद्यकीय अधिकारी डॉ. रामटेके, सुशील ब्राह्मणकर, डॉ. बंसोड तसेच रुग्णालयातील सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Related posts