आमदार डॉ परिणय फुके च्या प्रयत्नाने १६ कोटीची पाणी पुरवठा मंजुर

258 Views

बहुप्रतीक्षेनंतर पाणी पुरवठा मंजुर, लाखांदुर नगरवासीयांची पाण्याची वनवन थांबनार

प्रतिनिधि।

लाखांदुर। महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानातंर्गत आ. डाँ . परिणय फुके यांच्या अथक प्रयत्नाने बहुप्रतीक्षेत असलेल्या लाखांदुर नगरपंचायतीचा पाणी पुरवठा प्रकल्पाला नगरपरीषद प्रशासन संचालनालया मार्फत १६ कोटी ९१ लाख रुपये मंजुरी मिळाली असुन लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याने भविष्यात लाखांदुर वासियांना शुध्द आणि मुबलक पाणी मिळणार आहे .

राज्यात अन्य नगरपंचायत प्रमाणे लाखांदुर नगरपंचायत हद्दीतील लोकसंख्या मोठ्या झपाट्याने वाढत आहे. सद्याची लोकसंख्या १० हजाराच्या घरात पोहोचली आहे . मात्र आजवर लाखांदुर नगरवासियांना शुध्द आणि मुबलक पाणी मिळत नव्हते .कित्येकदा उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. पाणी टंचाईच्या अनेक तक्रारी निर्माण होत असल्याने सजग आणि सुज्ञ नगरपंचायत सदस्यांनी नविन पाणी पुरवठा प्रकल्प लाखांदुर नगरपंचायत हद्दीत निर्माण व्हावी यासाठी ठराव घेतला. विद्यमान विधानपरीषद सदस्य आ.डाँ. परिणय फुके यांच्याकडे लाखांदुर नगरात असलेली पिण्याच्या पाण्याची समस्या आणि वाढती लोकसंख्येचा विचार करुन भविष्यासाठी लाखांदुर नगरात मोठा पाणी पुरवठा प्रकल्प तयार व्हावा ह्या मागणीचा आग्रह विद्यमान नगरपंचायत सदस्यांनी केला.

आ. डाँ परिणय फुके यांनी लाखांदुर नगरपंचायत सदस्यांनी मागणी केलेल्या योजनेचा २०२० पासुन शासन स्तरावर पाठपुरावा कायम ठेवुन लाखांदुर नगरपंचायतला १६ कोटी ९१ लाखाची नविन पाणी पुरवठा मंजुर करुन दिली. यापुढे भविष्यात लाखांदुर वासियांना शुध्द व मुबलक पाणी मिळणार असल्याने आ. डाँ परिणय फुके यांचे लाखांदुर वासीयांकडुन अभिनंदन केल्या जात आहे.

सर्वाधिक विकासकामे लाखांदुर नगरपंचायत हद्दीत :

लाखांदुर नगरपंचायत भाजप प्रणीत असल्याने मागिल सरकारणे सर्वाधिक विकासकामे माजी आ. बाळा काशिवार आणि विद्यमान सदस्य परिणय फुके यांच्या प्रयत्नातुन खेचुन आणले . यात तालुकाध्यक्ष तथा गटनेते विनोदजी ठाकरे, नरेश खरकाटे यांच्या संकल्पणेतुन साकर झाले असल्याने सद्या विकासाच्या बाबतीत लाखांदुर नगरपंचायत राज्यात अग्रस्थानी पोहोचला आहे.

Related posts