गोंदिया-भंडारा भुमिगत विद्युत वाहिनीचा प्रश्न मार्गी लागणार – खा. श्री प्रफुल पटेल यांचा पुढाकार

372 Views

उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक, गोंदिया शहराकरिता १४२ कोटी प्रथम टप्पा व भंडारा शहराकरिता १८० कोटी दुसरा टप्पा अशा प्रकारे निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश…

प्रतिनिधि।

गोंदिया। गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील विद्युत वाहीनीचे जाळे अद्यावत करणे व जिल्हा स्तरावरील भुमिगत विद्युत वाहिनिचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा या सह पूर्व विदर्भातील प्रलंबित विद्युत संबंधि विषयावर चर्चा करण्यासाठी खा. प्रफुल पटेल यांचा आग्रहावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत गोंदिया भंडारा जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील विदयुत संबंधित प्रश्न मार्गी लावण्या संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या. यामुळे गोंदिया व भंडारा या दोन्ही नगरातील भूमिगत वाहिनी जाळयाचे प्रकल्प मार्गी लागणार अशी आशा वर्तविली जात आहे.

गोंदिया भंडारा या दोन्ही जिल्ह्यातील वीज संदर्भातील प्रलंबित प्रकल्प त्याच प्रमाणे कृषी वीज जोडणी चे प्रलंबित कामे मार्गी लावण्याचं उद्देशाने खा. प्रफुल पटेल यांचे आग्रहास्तव मंत्रालयात अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सर्व प्रलंबित प्रकल्पांच्या आढावा घेतला. यावेळी गोंदिया आणि भंडारा येथील भुमिगत विद्युत वाहिनीचा प्रश्न अनेक दिवसांपासून निधी अभावी प्रलंबित आहे. तर या दोन्ही जिल्ह्यातील विद्युत वाहिन्याचे नवीनीकरणाचे कामे , शेतकऱ्यांना २४ तास वीज तसेच कृषीपंपाचे कनेक्शन आदी बाबींवर माहिती घेण्यात आली . दरम्यान सर्व प्रलंबित प्रश्न व प्रकल्प त्वरीत मार्गी लावण्यात यावे अशे निर्देश ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिले.

याप्रसगी गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्यातील विजे संबंधी प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्वरीत निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विभागाला आश्वासित केले .या मध्ये गोंदिया शहराकरिता १४२ कोटी प्रथम टप्पा व भंडारा शहराकरिता १८० कोटी दुसरा टप्पा अशा प्रकारे निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहे.

या सदर बैठकीला मा. ऊर्जा मंत्री डॉ. नितिन राऊत, मा. राज्य ऊर्जा मंत्री श्री प्राजक्त तनपुरे, श्री देवाशीष चक्रवर्ती (अप्पर मुख्य सचिव नियोजन विभाग ), श्री मनोज सौनिक ( अप्पर मुख्य सचिव , वित्त विभाग ) , श्री राजीव मित्तल सचिव वित्त (व्यय), व्यवस्थापकीय संचालक महावितरण व इतर सर्व संबधित विभागीय अधिकारी उपस्थित होते.

Related posts