गोंदिया: वनजमिनीवर अतिक्रमणं करून धान उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे तांत्रिक अडचण दूर करून धान खरेदी करावे- आ. डॉ. परिणय फुके

316 Views

गोंदिया: वनजमिनीवर अतिक्रमणं करून धान उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे तांत्रिक अडचण दूर करून धान खरेदी करावे- आ. डॉ. परिणय फुके

 प्रतिनिधि।
गोंदिया। गोंदिया जिल्ह्यामध्ये बऱ्याच वर्षांपासून वनजमिनीवर धान उत्पादक शेतकरी शेती करीत आहेत. सध्या नवीन धान काढणे सुरू असून सदर धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे धान घेणे शासणाकडून सुरू केले आहे.सदर धान घेतांना संगणकामध्ये रितसर नोंदणी करणे सुरू आहे. परंतु वनजमिनीवर अतिक्रमणं करून धान उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे 7/12 वर सरकार अतिक्रमण असा उल्लेख केला असल्यामुळे धान खरेदी केंद्रावर त्यांचे धान घेण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे शेती करणाऱ्या  शेतकऱ्यांना वेळेवर धान मोजणी होत नसल्याने आर्थिक अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे त्यांचे सुद्धा धान खरेदी केंद्रावर, धान खरेदी करण्यात यावे अशी विनंती शेतकऱ्याकडून आ.डॉ. परिणय फुके यांना करण्यात आलेली होती.
   त्यानुषंगाने आज आ. डॉ. फुके यांनी गोंदिया चे जिल्हाधिकारी श्री दीपककुमार मीना यांना भेटून शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यासाठी येत असलेल्या अडचणींबाबत चर्चा करून धान खरेदी करण्याकरिता तांत्रिक अडचण दूर करून धान खरेदी करावे अशा मागणीचे निवेदन दिले.
   यावर जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांची समस्या लवकरच दूर करून धान खरेदी करण्यात येईल असे सांगितले. यावेळी आ.विजय रहांगडाले, संजय टेभरे उपस्थित होते.

Related posts