गोंदिया: नवेगांव बांध पोलीसांची धडक कारवाई, चोरी गेलेला टैंकर केला जप्त

340 Views

हकीक़त रिपोर्टर।
गोंदिया। दिनांक १०/१२/२०२० रोजी पोलीस स्टेशन नवेगांव बांध येथील पो.हवा. शेख यांना माहिती मिळाली की, नागपुर येथुन टैकर क्रमांक एम.एच.४६ वी.एम.२३१२ हे वाहन कोणीतरी अज्ञात ईसमाने चोरुन नेला असुन सदर टैंकर हे नवेगांव बांध कडे येत आहे. सदर ची माहिती तात्काळ पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, ठाणेदार पो.स्टे.नवेगांव बांध यांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, ठाणेदार पो.स्टे.नवेगांव बांध यांनी माहितीचे गांरभीय लक्षात घेता सदर टैकर चे शोध कामी पथक तयार केला.

   सदर पथक हा टैकर चा शोध घेत असता नवेगांव बांध ते गोठणगांव कडे जाणा-या मार्गावर सदर टैंकर येतांना दिसला त्यास थांबण्याचा ईशारा.केला असता त्याने टैंकर न थांबविता गतिने वाहन पळवुन नेला त्याचा पाठलाग केला असता पलटुदेव पहाडीच्या समोर नेवुन टैकर चालु स्थितीत सोडुन रोड लगत जंगलात पळुन गेला. सदर जंगल परीसर दाट असल्याने त्याचा.शोध लागला नाही.
सदर ईसमाचा शोध न लागल्याने पथकातील कर्मचारी हे टैंकर असलेल्या ठिकाणी परत येवुन टैकर ची तपासणी केली असता त्यात मिळालेले कागदपत्रे ताब्यात घेवुन टैंकर क्रमांक एम. एच.४६ वी एम.२३१२ हे पुढील कार्यवाही करीता पोलीस स्टेशन ला घेवुन आलेत. सदर टैंकर चोरी बाबत पोलीस स्टेशन कपीलनगर नागपुर शहर येथे गुन्हा दाखल होत असुन पुढील कार्यवाही सुरु आहे.

    सदरची कार्यवाही  पोलीस अधीक्षक  विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी , उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी जालींधर नालकुल यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, पो.हवा. साबीर शेख पोहवा अनंत तुलावी , पोशि दिपक कराडे, चासफो. सयाम यांनी केली.

Related posts