गोंदिया: ओबीसीच्या उत्थानासाठी जनगणना होणे आवश्यक, जिला राष्ट्रवादी काॅंग्रेस ओ.बी.सी. सेल ची बैठक गोंदिया येथे संपन्न

273 Views

गोंदिया: ओबीसीच्या उत्थानासाठी जनगणना होणे आवश्यक, जिला राष्ट्रवादी काॅंग्रेस ओ.बी.सी. सेल ची बैठक गोंदिया येथे संपन्न

प्रतिनिधि।

गोंदिया। जिल्हा ओ.बी.सी सेल पदाधिकारी व कार्यकर्तांची महत्वपुर्ण बैठक आज राष्ट्रवादी काॅग्रेस भवन रेलटोली गोंदिया येथे माजी खासदार डा. खुशाल बोपचे यांचे अध्यक्षतेत, आमदार श्री मनोहर चंद्रीकापुरे व जिला अध्यक्ष प्रभाकर दोनोडे यांच्या प्रमुख उपस्थिीतीत पार पडली. बैठकित पदाधिकारी व कार्यकर्तांना संबोधित करतांना माजी खासदार डाॅ. बोपचे यांनी ओबीसी समाजाला न्याय दयायचे असेल तर 2021 च्या जनगनने मध्ये ओबीसीचे काॅलम असले पाहिजे तरच ओबीसींना न्याय मिळु शकतो फक्त ओबीसी चे मंत्रालय उघडुन चालनार नाही. ओबीसी समाजाच्या उत्थानासाठी समाजाला संविधानाचा अभ्यास करावा लागेल, संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करुनच सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण दुर करता येईल. उठ ओबीसी जागा हो । संघर्षाचा धागा हो ! हा नारा देण्याची वेळ आता आलेली आहे. आमदार श्री चंद्रिकापुरे यांनी पण उपस्थितांना संबोधित केले.
राष्ट्रवादी काॅग्रेस ओबीसी सेल च्या वतीने केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी बिलाचा तीव्र निषेध करण्यात आला व देशातील शेतकरी व शेतमजुर वर्गाला वयाच्या 60 वर्षापासुन पेंशन योजना लागु करावी अशी रोखठोक भुमीका यावेळी राष्ट्रवादी काॅग्रेस ओबीसी सेलच्या पदाधिकारी व कार्यकर्तांयानी घेतली.
सर्वश्री आमदार मनोहर चंद्रीकापुरे, खुशाल बोपचे माजी खासदार, पंचम बिसेन, विनोद हरिणखेडे, गंगाधर परशुरामकर,, प्रभाकर दोनोडे, बाळकृष्ण पटले, डी.यु. रहांगडाले, श्रीमती मंजुताई डोंगरवार, कुंदा दोनोडे, सुकरामजी फुडे, मोहन पटले, डाॅ किशोर पारधी, शैलेष वासनिक, अजय बिसेन, सुभाष यावलकर, प्रदिप रोकडे, राजेश कापसे, राजेश ठाकरे, चंद्रकुमार चुटे, प्रमोद लांजेवार, छाया भगत, रघुदास नागपुरे, रिताताई यावलकर, कुवरलाल बावनथडे, ईश्वर उकरे, छोटु पंचबुद्धे, एकनाथ वहिले, संजीव राय, सौरभ रोकडे, संजय रहांगडाले, कुंवरलाल बावनथडे, बबलु बिसेन, राजु ठाकरे, पंकज चैधरी, विनोद भांडारकर, जागेश्वर माहुले, भुपेंद्र पटले, दिनेश कोरे, पुरणलाल उके, डाॅ सुरेश कावळे, तिलकचंद पटले, घनश्याम हेमने, अजय येरणे, सुधीर उके, जागेश्वर रहांगडाले, अंगलाल कटरे, प्रविणकुमार नागपुरे, चेतन कुभारे, आकाश नागपुरे, सतिश भगत, युवराज लांजेवार, दुर्योधन शेंडे , विनोदजी मेश्रााम, कपील बावनथडे, लक्ष्मीनारायण डोये, राजेश मटाले, कुणाल बावनथडे, मोनु मेश्रााम, नंदकिशोर दोनोडे, डाॅ सुरेशअंबुले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Related posts