महायुतिचे उमेदवार राजकुमार बडोले यांच्या चुनाव प्रचारार्थ खा. प्रफुल पटेल यांची बैठक संपन्न

181 Views

 

अर्जुनी मोरगाँव।आज प्रसन्ना सभागृह, अर्जुनी मोरगाव येथे महायुतीचे उमेदवार श्री राजकुमार बडोले यांच्या चुनाव प्रचारार्थ खा.श्री प्रफुल पटेल व श्री परिणय फुके, आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीत मित्र पक्षाची संयुक्त बैठक पार पडली.

जण सेवेला प्राधान्य देत राजकारणा सोबतच समाजकारण करण्याचे काम सदैव केले आहे. हा भाग धान उत्पादन शेतकऱ्यांचा असून धानाच्या व्यतिरिक्त ऊस, मका, भाजीपाला, फळबागा इतर पिके घेतली जातात. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी लाखांदूर येथे साखर कारखाना सुरु केले आहे. भविष्यात या भागातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने इतर पिके घेण्यासाठी सहकार्य करू. आज आमच्या जाहीरनाम्यातून महिला, शेतकरी, शेतमजूर, युवक, जेष्ठ नागरिक यांच्या कल्याणासाठी विविध योजनाच्या माध्यमातून परिवर्तन घडविण्यास काम आम्ही कटिबध्द आहोत असे प्रतिपादन खा. श्री प्रफुल पटेल यांनी केले.

खासदार श्री प्रफुल पटेल यांच्यासोबत सर्वश्री राजकुमार बडोले, परिणय फुके, रामदास कोहाळकर, सुरेंद्र नायडू, यशवंत गणवीर, भाऊदास जांभुळकर, नारायण डोंगरवार, नामदेव डोंगरवार, बंडू भेंडारकर, लायकराम भेंडारकर, नाजूक कुंभरे, गजानन डोंगरवार, लोकपाल गहाणे, किशोर तरोणे, केवळराम पुसतोडे, विजय कापगते, चामेश्वर गहाणे, रचना गहाणे, पौर्णिमा ताई ठेंगे, मंजुषा तरोणे, सुशीला हलमारे, चित्रलेखा मिश्रा, चेतना कांबळे, आम्रपाली डोंगरवार, पुष्पलता दृगकर, मंजुषा बारसागडे, उज्वल दीरबुडे, जितेंद्र मौर्या, प्रकाश गहाणे, मुकेश जैस्वाल, होमराज पुस्तोडे, रतिराम राणे, श्रीनारायन डोंगरवार, राकेश जयस्वाल, जगदीश चितलांगे, भोजराम रहिले, श्रावण मेंढे सहित मोठया संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts