गोंदिया : जनावरांची अवैध वाहतुक करणारे ०७ बोलेरो पिकअप, ३७ जनावरांसह ४९ लाख, २८ हजार, ५००रु. किंमतीचा मुददेमाल जप्त…

298 Views

 

पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

प्रतिनिधि।
गोंदिया। विश्व पानसरे, पोलीस अधीक्षक, गोंदिया यांनी जिल्हयातील अवेध व्यावसायीकांविरुध्द धडक कारवाई करणेबाबत जिल्हयातील सर्व पोलीस थाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेला आदेशित केले आहे. दिनांक २५ नोव्हेंबर २०२० रोजी पोलीस ठाणे दवनीवाडा परिसरात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोॉलिंग करीत
असताना सदर पथकाला चंगेरा कडून ५ ते ७ बोलेरो पिकअप या वाहनांमध्ये हेले व म्हशी यांना निर्दयतेने कोंबून त्यांना कत्तली करीता धापेवाडा- तिरोडा मार्गे नागपूर येथे जात असल्याची गोपनिय माहिती मिळाली।

पोलीस अधीक्षक, गॉंदिया यांचे मार्गदर्शनाखाली सदर पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे धापेवाडा नाल्याचे वळणावर जेथे वाहनांची गती कमो होईल अशा ठिकाणो नाकाबंदो केली असता चंगेराकडून रतनारा धापेवाडा मार्गे ०७ पिकअप बोलेरो वाहन पोलीस पथकाचे दिशेने एकापाठोपाठ एक असे येतांना दिसले. त्या सर्व वाहनांना थांबबून सर्च लाईटचे उजेंडात सदर वाहनांच्या मागील डाल्याची ताडपत्री उघडून पाहणी केली असता बोलेरो पिकअप वाहन क्रमांक १) एम.एच.२८/बीबी-०२९६ २) वाहन क्र. एम.एच.३६/एफ-३०६२ ३) टाटा कंपनीचे झेनॉंन वाहन क्रमांक एम.एच.२०/सौटी-६१८५ ४ ) बोलेरो पिकअप वाहन क्रमांक- एम.एच. ३५/एजे- १५२४ ५ ) वाहन क्रमांक- एम.एच. ३५/के ४३०२ ६) वाहन क्रमांक एम.एच. ३५/के- ३३९२ ७) वाहन क्रमांक एम.एच. ३५/एजे-०९४३ या ०७ बाहनामध्ये एकूण ३७ म्हशी व हेले यांना चारा पाण्याची कृठलीही व्यवस्था न करता व हालचाल करता येणार नाही अशा पध्दतीने अतिशय निर्दयतेने कोंबून भरल्याचे दिसले.

वाहन चालक यांचेकडे विचारणा केली असता त्यांनी त्यांचेकडे जनावर वाहतुकीचा परवाना नसल्याचे सांगितले. यावरुन आरोपी १) रविशांकर हिरालाल बिजेवार वय- २९ वर्षे रा. काटी (चालक) २) अजहर कमाल बेग वय- २३ वर्ष रा. चंगेरा (क्लोनर) ३) किशन राजाराम कावरे वय- २४ वर्षे रा. काटी ( चालक) ४) अनिल हौसलाल उके वय- २७ वर्षे रा. चंगेरा (क्लीनर व जनावर मालक) ५) मजहर कमाल बेग वय- २७ वर्ष रा. चंगेरा (चालक) ६) मुस्ताक राज
खॉन वय- ४९ वर्षे रा. चंगेरा (क्लोनर व जनावर मालक) ७) सचिन अमरसिंग सावंत वय- २३ वर्षे रा. कोचेवाही (चालक) ८) दिलीप जितेन्द्र रंगारी वय- ३० वर्षे रा. चंगेरा ( क्लीनर) ९) खेमराज मेकचंद टेकाम वय- २७ वर्षे रा. चंगेरा, (चालक) १०) अशोक गेंदलाल बागळे बय- ३० वर्षे रा. चंगेरा (क्लीनर) ११) सोहेब मुकीम बेग वय- २१ वर्षे रा. चंगेरा (चालक) १२) शिवराम उदेलाल हिरवानी वय- ४६ वर्षे रा. चंगेरा (क्लीनर व जनाबर मालक) १३) ऐबराज निसार खान
क्य- २४ वर्षे रा. चंगेरा (चालक) १४) तोफोक तालीब खॉन वय- २० वर्षे रा. चंगेरा ( क्लीनर व जनावर मालक) व बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम.एच. ३५/के- ४३०२ या वाहनातील जनावरांचा मालक १५) जयराम उदेलाल हिरवानी यांचे बिरुध्द प्राण्यांना क्रूरतेने बागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम १९ (१) (ड) (ई)( फ ) (ह), सहकलम ५( अ) (२), ९ महाराष्ट्र पशु संवर्धन अधिनियम २०१५, सहकलम १०९ भादंबि. अन्वये पोलीस स्टेशन दवनीवाडा येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदर कारवाई मध्ये ३७ जनावरे, १२ मोबाईल व ०७ वाहनांसह ४९ लाख, २८ हजार, ५००/-रूपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर कारवाई विश्व पानसरे, पोलीस अर्धीक्षक, गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री बबन आव्हाङ, पोलीस कर्मचारी लिलेन्द्र बेस, कवलजितपालसिंग भाटीया, अर्जुन कावळे, मधुकर कृपाण, राजु मिश्रा, रेखलाल गौतम, महेश मेहर, चित्तरंजन कोडापे, नेबालाल भेलाबे, इंद्रजित बिसेन, अजय राहांगडाले व चालक मुरली पांडे यांनो या कारवाईमध्ये सहभाग घेतला असून सदर कारवाई मध्ये सहभागी अधिकारी व कर्मचारी यांचे पोलीस अरधीक्षक, गोंदिया यांनी अभिनंदन केले आहे

Related posts