भंडारा: नागरिकांच्या आरोग्य धोक्यात, नियम व अटींच्या अधीन राहून बंद आर.ओ.केंद्र सुरू करण्याची मागणी, आ.परिणय फूके यांचे जिल्हाधिकारी यांना पत्र

372 Views
प्रतिनिधि।
भंडारा। भंडारा जिल्ह्यामध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार शहरासह ग्रामीण भागातील  सर्व आरओ वॉटर प्लांट नियम व मानक मध्ये बसत नसल्यामुळे सील करण्यात आले आहे. भंडारा शहरात काही दशकापासुन दूषित पाणी पुरवठा होत असल्याने बऱ्याच लोकांनी माफक दरामध्ये शुद्ध  आरओ चे पाणी मिळत असल्यामुळे पाणी विकत घेत होते. परंतु शासनाकडून कोणतीही पूर्वसूचना न देता आर.ओ. चालविण्याची परवानगी अचानक बंद केल्यामुळे लोकांना पुन्हा विहिरीचे, बोरवेलचे पाणी पिण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील वैनगंगा नदिमधील संपूर्ण पाणी दूषित झालेले असून हे पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे दूषित पाण्याने मानवी जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता नकारता येत नाही. त्यामुळे नियम व अटीच्या अधीन राहून आर.ओ.सुरू करण्याची मागणी आर.ओ.चालविणारे व्यावसायिक व नागरिकांनी केलेली आहे.
   तरी नागरिकांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेता नियम व अटींच्या अधीन राहून आर्. ओ.केंद्र सुरू करण्याची परवानगी देण्याबाबत जिल्हाधिकारी भंडारा यांना आ.परिणय फूके यांनी पत्र दिले आहे.

Related posts