गोंदिया: अमली पदार्थ “गांजा” बाळगणाऱ्या, साठा करणाऱ्या दोघांना अटक , 7 किलो 648 ग्रॅम गांजा जब्त

680 Views

पोलीस ठाणे रावणवाडी आणि रामनगर पोलीसांची कामगिरी..

गोंदिया। (4सेप्ट), पोलीस अधीक्षक, निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक, अशोक बनकर, यांनी आगामी काळात साजरे करण्यात येणारे सण उत्सवाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या चालणाऱ्या सर्व  बेकायदेशीर धंद्यांवर प्रभावी धाडी घालून दर्जेदार कारवाई करून सर्व अवैध धंदे समुळ नष्ट करण्याचे तसेच अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन, आळा घालण्याकरीता अवैध धंदे करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या निर्देश सूचना दिल्या होत्या.
या निर्देशानुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी, गोंदिया सुनील ताजने, यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात गोंदिया उपविभागात धाड मोहीम राबविण्यात आली आहे.
दि.03/09/2023 रोजी पो. नि.पुरुषोत्तम अहेरकर, पोलीस ठाणे रावणवाडी यांना गुप्त बातमीदारकडून माहिती मिळाली की, दोन ईसंम हे मोटार सायकलने अवैध रित्या गांजा बाळगून विक्री करीता ग्राम – काटी येथे येणार आहेत. अशी माहिती प्राप्त झाल्यानें सदर बाबत वरिष्ठांना माहिती कळविण्यात आली, वरिष्ठांचे आदेश, व दिशा निर्देश व प्राप्त परवानगी वरून मिळालेल्या माहितीच्या आधारे धाड कारवाईस लागणारे आवश्यक सर्व साहित्य सोबत घेऊन पंच, पो. स्टाफसह  मौजा- काटी बाजार चौक येथे सापळा रचून 03.05 वा. छापा घालून धाड कारवाई केली।
या कार्रवाई दरम्यान एक टी.व्ही. एस. अपाचे दुचाकी वाहन क्र. एम.एच. 35 ए.टी 4406  किमंती अंदा. 70,000/- मिळून आली. सदर वाहनाची तपासणी केली असता दुचाकीवर  एका प्लास्टीक चे बोरीमध्ये 05 किलो 350 ग्रॅम ओलसर हिरवट उग्र वास असलेला गांजा कि. अंदा. 15, हजार रु. प्रती किलोप्रमाणे किमंती -80,250/ – रु असा एकूण- 1 लाख 50 हजार 250/ रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने जप्त करण्यात आला आहे. कारवाईची सविस्तर जप्ती प्रक्रिया करण्यात आलेली आहे.
सदर प्रकरणी आरोपी नामे – 1) रजत चंद्रशेखर सपकाळ वय 24 वर्षे राहणार सैनिक कॉलोनी कटंगी गोंदिया,  2) पंकज सोहनलाल राणे वय 25 वर्षे राहणार सिव्हील लाईन, डब्लिंग कॉलनी गोंदिया यांचेविरूध्द पोलीस ठाणे रावणवाडी येथे अप.क्र.255/2023 कलम 8 (क), 20, 29 एन.डी. पी. एस.  कायदया न्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे वरील नमूद रावणवाडी गुन्ह्यातील आरोपी नामे – 1) रजत चंद्रशेखर  सपकाळ रा. विजयनगर कटंगीकला याने त्याचे घरी अंमली पदार्थांचा अवैध रित्या साठा करून ठेवला आहे अशी खात्रीशीर माहिती पो. नि. पो. स्टे. रामनगर यांना प्राप्त झाल्यानें पोलीस निरीक्षक पोलीस ठाणें रामनगर यांचे मार्गदर्शनात आरोपी राहते घरी छापा पो. स्टाफ सह धाड कारवाई केली असता आरोपीचे राहते घरी घरझडतीत 2 किलो 298 ग्रॅम हिरवट रंगाचा उग्र वास येत असलेला गांजा सदृश्य अंमली पदार्थ किंमती अंदाजे 20,000/- रुपयाचा मिळून आल्याने  जप्त करण्यात आला.
सदर प्रकरणी आरोपी नामे -1) रजत चंद्रशेखर सपकाळ वय 24 वर्षे राहणार सैनिक कॉलोनी कटंगी गोंदिया याचेविरूद्ध पो.ठाणे रामनगर गोंदिया येथे सुध्दा एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नमूद दोन्ही दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील कायदेशीर कारवाई रावणवाडी व रामनगर पोलीस करीत आहेत.
सदरची उत्कृष्ठ दर्जेदार कारवाई वरिष्ठांचे निर्देश व आदेशा प्रमाणे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर पो ठाणे रावणवाडी यांचे मार्गदर्शनात सपोनि. बाबासाहेब सरवदे , सुनील अंबुरे, पोलीस अंमलदार पोहवा- चव्हान, पो.शि. टेंभरे, दगडे, मेश्राम, चापोहवा खरबडे यांनी तर पो.नि. संदेश केंजळे पो. ठाणे रामनगर, यांचे मार्गदर्शनात सपोनी. बस्तवाडे, पो.उप. नि. सुशील सोनवणे, पो.हवा. सुनिलसिंह चौव्हान, छत्रपाल फुलबांधे, जावेद पठाण आशिष अग्निहोत्री पो.ना. बाळकृष्ण राऊत, पो. शि. कपिल नागपुरे म.पो. शि. रुपकला रहिले यांनी कामगीरी केलेली आहे.

Related posts