गोंदिया: धानविक्री करणार्‍या शेतकर्‍यांचे मिळणार थकीत चुकारे, खा. पटेल च्या अधिकार्‍यांना निर्देश..

497 Views

 

चुटिया येथील प्रकरणाची दखल..

गोंदिया : तालुक्यातील चुटिया येथील धान खरेदी संस्थेचा घोटाळा समोर आल्यानंतर पणन विभागाने त्या संस्थेत धानविक्री करणार्‍या शेतकर्‍यांचे चुकारे थांबविले. त्याचबरोबर जिल्ह्यातील अनेक संस्थांमध्ये विक्री करणार्‍या शेतकर्‍यांचे चुकारे थांबविण्यात आले. यासाठी पाठपुरावानंतरही पणन विभागाने अद्यापपर्यंत कसलीही भुमिका घेतली नाही. या संदर्भात माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात शेतकर्‍यांनी खा.प्रफुल पटेल यांची भेट घेतली. दरम्यान खा.पटेल यांनी थेट व्यवस्थापकीय संचालक मुम्बई व पणन विभागाच्या अन्य अधिकार्‍यांशी चर्चा करून थकीत चुकारे त्वरित अदा करण्यात यावे, अशा सुचना केल्या.

यावर विभागाकडून लवकरच चुकारे अदा करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे अडकलेले चुकारे शेतकर्‍यांना मिळणार आहेत. खा.प्रफुल पटेल यांना भेटणार्‍या शिष्टमंडळाने त्यांचे आभार मानले.
गोंदिया तालुक्यातील चुटिया येथील श्रीराम अभिनव संस्थेने खरीप रब्बी हंगामात खरेदी केलेल्या धानामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ केल्याचे समोर आले. जवळपास २५ हजार क्विंटल धान त्या संस्थेकडून पणन विभागाला घेणे आहे. या प्रकाराला घेवून पणन विभागाकडून या संस्थेमध्ये विक्री केलेल्या धानाचे चुकारे अडविण्यात आले. यासाठी शेतकर्‍यांकडून सतत पायपीट केली जात आहे. मात्र पणन विभागाकडून चुकारे अदा करण्यासंदर्भात कसलीही ठोस भुमिका घेण्यात आलेली नाही. जवळपास ४३३ शेतकर्‍यांचे चुकारे अडकले आहेत. या संदर्भात माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात शेतकर्‍याच्या शिष्टमंडळाने खा.प्रफुल पटेल यांची भेट घेवून व्यथा मांडली. दरम्यान क्षणभराचा वेळ वाया न घालवता खा.प्रफुल पटेल यांनी थेट पणन विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला. ज्या शेतकर्‍यांचे चुकारे अडविण्यात आले आहेत, त्या शेतकर्‍यांना चुकारे अदा करण्यात यावे, अशा सुचना केल्या.

यावर पणन विभागाच्या अधिकार्‍यानी मान्य करीत लवकरच चुकारे शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिले. खा.प्रफुल पटेल यांच्या पाठपुराव्याने शेतकर्‍यांचे प्रश्न मार्गी लागणार असल्याने आशा पल्लवित झाली आहे. यामुळे शेतकर्‍यांनी देखील खा.प्रफुल पटेल यांचे आभार मानले आहे.

शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळात तुकाराम बघेले, अनिल पगरवार, राजाराम पगरवार, मोतीलाल लिल्हारे, शिशुला लिल्हारे, गणेशलाल लिल्हारे परबता लिल्हारे, हंसराज लिल्हारे, शोभेलाल कंसारे, गब्बूलाल कंसारे, छोटेलाल रहांगडाले, प्रमोद रहांगडाले, कृष्णकुमार रहांगडाले, रेखाबाई रहांगडाले, राजाराम बघेले, जितेंद्र बघेले, डिलेश्वरी गौतम, रुदन गौतम, भाऊलाल बिसेन, ओमप्रकाश पटले, राजेंद्र तुरकर, प्रीतमलाल ठाकरे, अनुज रहांगडाले, घनश्याम पटले, डीलुचंद तुरकर, चुन्नीलाल येळे, योगराज अटरे, मुन्नालाल गौतम, श्यामलाल गौतम, होऊशलाल गौतम, परशराम गौतम, नंदकिशोर बघेले, सुमित पटले, मुनेश्वर पटले, ताराबाई चौहान, सर्जू चौहान, मोरेश्वर अंबुले, मिलकन बाई अंबुले, कृष्णा पटले, सेवकरं शेंडे, अंजनाबाई शरणागत, रमेश भगत, प्रेमलाल भगत, मोलानबाई चौधरी, माणिकचंद ठाकरे, धनलाल हरिणखेडे, भागचंद पटले, मेघश्याम चौधरी, बिसराम चौधरी, हरिराम पारंगडुरकर, बिराजलाल कुंभलकर, जयराम पालांदूरकर, चारदास पालांदूरकर, अनिल गौतम, लेखरं गौतम, देवेंद्र टेभऱे, दिलीप टेम्भरे, दिलीप टेम्भारे, कुमराम गौतम, डिलेश टेम्भारे, नानाजी चौहान, रमेश हरिणखेडे, लाला शरणागत, अशोक चिखलोंडे, कृष्णदयाल बावणे, छन्नुबाई पटले, कुंजीलाल लिल्हारे, साहेबलाल लिल्हारे, अशोक रहांगडाले, दासराम बावनकर, चंदन पटले, मायाराम हरिणखेडे, योगराज रहांगडाले, त्रिलोक ढोमणे, हसनलाल दमाहे, जवाहरलाल रहांगडाले, जनकलाल पटले, माणिकचंद पटले, रितेश कर्मकार, योगराज बिसेन, यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

Related posts