खा. प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत तिरोडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न..

91 Views  तिरोडा। आज(0७एप्रिल) सिंधी लॉन, तिरोडा येथे खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पक्ष संघटन बळकटीकरण, आगामी निवडणुका तसेच स्थानिक विकास कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी खासदार श्री प्रफुल पटेल यांनी तिरोडा नगर परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून पक्ष अधिक मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी केले. बैठकीला राजेंद्र जैन, देवेंद्रनाथ चौबे, प्रेमकुमार रहांगडाले, राजलक्ष्मी तुरकर, योगेंद्र भगत, अजय गौर, राजेश गुनेरिया, नरेश कुंभारे,…

Read More