डांगोरली उपसा सिंचन प्रकल्पाला मिळाली प्रशासकीय मंजूरी, परिसर होणार सुजलाम सुफलाम- खा. प्रफ़ुल्ल पटेल

685 Views  गोंदिया। वैनगंगा नदीवर डांगोरली उपसा सिंचन उच्च पातळी बंधारा निधी अभावी रखडलेला होता. उपसा सिंचन लवकरात लवकर पूर्ण होऊन परिसरातील शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी खा.प्रफुल पटेल हे प्रयत्नशील होते. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री माननिय अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री माननिय देवेंद्र फडणवीस यांच्याशी सतत पाठपुरावा केला होता. याचे फलित म्हणजे काल दि. १० ऑक्टोबर ला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत डांगोरली उपसा सिंचन प्रकल्पाला उच्च पातळी बंधाऱ्याकरिता टप्पा १ अंतर्गत ३९५ कोटी रुपयाचा निधी मंजूरी प्रदान करण्यात आलेला आहे. गोंदिया तालुक्यातील डांगोरली व आसपासच्या परिसरातील गावांना…

Read More