नव्या प्रेमवीरासोबत मिळून काढला प्रियकराचा काटा; दुधात विष मिसळून गळा घोटला

40,710 Viewsउत्तराखंडच्या काशीपुरात चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कुलदीपचा मृतदेह नाल्यातून सडलेल्या अवस्थेत सापडला आहे. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार त्याचा गळा आवळून खून करण्यात आला होता. पोलिसांनी नी मृत तरुणाचा मोबाईल घटनास्थळावरुन ताब्यात घेतला आहे. बडी बरखेडी येथील रहिवासी कुलदीप सिंग (वय 22) हे गुरजितसिंग ठाकूरद्वारा येथील वी गॉर्ड कंपनीत काम करत होता.२९ जून रोजी रात्री नऊच्या सुमारास तो फिरायला बाहेर गेला. त्यानंतर तो रहस्यमयपणे बेपत्ता झाला होता. त्याच्या आजोबांनी (बूटा सिंग) पैगा पोलीस चौकीत हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी कुलदीपच्या दोन मोबाइल फोनचे नंबरचा तपास केला असता, एक तरुणी त्याच्या संपर्कात असल्याचे समोर आले.…

Read More

पित्याला १४ वर्षीय विवाहितेचे सतत माहेरी येणे खटकले; रागाच्या भरात गळा दाबून केली हत्या

14,555 Viewsबीड : वडवणी तालुक्यातील चिखल बीड येथील अल्पवयीन विवाहितेचा खून तिच्या वडिलांनीच केला होता. दरम्यान पोलिसांनी वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर गुरुवारी न्यायालयात हजर केले. यावेळी त्यास सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  वडवणी तालुक्यातील पिंपळा येथे शीतल दादासाहेब तोगे (वय १४) या विवाहितेचा मृतदेह एका उसाच्या शेतात मंगळवारी आढळून आला होता. वडवणी पोलिस ठाण्याचे सपोनि महेश टाक यांनी या खून प्रकरणाचा २४ तासांत उलगडा केला. मृत शीतलचा खून तिचे वडील प्रकाश काशीनाथ भांगे यानेच केल्याचे तपासात समोर आले होते. याप्रकरणी मंगळवारी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला गेला…

Read More

चिनी प्रायोजक हटवण्यात कायदेशीर अडचण?

717 Viewsगलवान खोऱयातील संघर्षानंतर चिनी उत्पादने, प्रायोजकांवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत असली तरी बीसीसीआयला आयपीएलचे प्रायोजक व्हिवो कंपनीशी असलेला करार एका झटक्यात तोडून टाकणे शक्य होणार नाही, असे संकेत आहेत. व्हिवो व आयपीएल यांच्यात झालेल्या करारात नमूद असलेले ‘एक्झिट क्लॉज’ व्हिवो कंपनीला पूरक ठरेल व याच तरतुदीमुळे बीसीसीआय हा करार रद्द करु शकणार नाही, असे प्राथमिक चित्र आहे. पूर्व लडाखमध्ये 15 जून रोजी झडलेल्या संघर्षानंतर केंद्र सरकारने चीनच्या 59 ऍपवर बंदी घातली. यात वादग्रस्त टिकटॉक ऍपचा प्राधान्याने समावेश राहिला. त्यानंतर बीसीसीआयने आयपीएल प्रायोजक कंपनी व्हिवोशी असलेल्या करारावर फेरविचार केला…

Read More

महाराष्ट्रात आतापर्यंत कोविडसंदर्भात 1 लाख 41 हजार गुन्हे दाखल : अनिल देशमुख

1,394 Viewsमहाराष्ट्रात लॉक डाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भात कलम 188 नुसार 1 लाख 41हजार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी दिली. ते म्हणाले, महाराष्ट्रात लॉक डाऊनच्या सुरुवातीपासून म्हणजेच 22 मार्च ते 2जुलै या 1,41,258 गुन्ह्यांची नोंद झाली असून 29,559 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तसेच विविध गुन्ह्यांसाठी 12 कोटी 25 लाख 11 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तर अत्यावश्यक सेवेसाठी 5 लाख 48 हजार 005 पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले. पुढे ते म्हणाले, लॉक डाऊनच्या काळात पोलिसांवर हल्ला होण्याच्या 292 घटना घडल्या. यामध्ये…

Read More

पडळकरांच्या मुद्द्यावरून फडणवीस आक्रमक; राष्ट्रवादीवर डागली तोफ

821 Viewsअमरावती: आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसला आता राजकारण करायचं आहे. त्यासाठीच हा वाद कसा वाढत जाईल यावर राष्ट्रवादीचे नेते भर देत आहेत, असं सांगतानाच आमच्याविरोधात जेव्हा राष्ट्रवादीचे पदाधिकारी खालच्या पातळीवर टीका करत होते. तेव्हा राष्ट्रवादीचे नेते गप्प का होते? खरे तर राष्ट्रवादीला या विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज अमरावतीत आले होते. यावेळी त्यांनी अमरावतीतील कोविड सेंटरची पाहणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना गोपीचंद पडळकर यांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीवर निशाना साधला. पडळकरांच्या मुद्द्यावर मी आधीच प्रतिक्रिया व्यक्त केली…

Read More