778 Views गडचिरोली जिल्हयातील पाऊस व नद्यांचा वाढत्या विसर्गामुळे घेतला निर्णय… गडचिरोली,(जिमाका)दि.14: जिल्हयात 10 जुलै पासून मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावल्यामुळे प्रमुख नद्यांसह छोट्या नाल्यांमधून पाणी वाहत आहे. यामुळे अहेरी, सिरोंचा व भामरागड तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच गडचिरोली, आरमोरी या भागातही पाऊस मोठ्या प्रमाणात पडत आहे. जिल्हा प्रशासनाने दि.11 ते 13 जुलै दरम्यान आत्यावश्यक सेवा वगळता बाकी आस्थापना बंद राहणार याबाबत आदेश निर्गमित केले होते. आता सदर आदेशाला जिल्हाधिकारी संजय मीना यांनी शनिवार, दि.16 जुलै 2022 च्या मध्यरात्री पर्यंत वाढ केली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांनी घाबरून…
Read MoreCategory: Maharashtra
मुंबई: जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या कालावधीत वाढ
832 Views मुंबई। जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा कार्यकाळ हा तीन महिन्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाचा कार्यकाळ हा अधिकृत राजपत्रातील आदेशाद्वारे राज्य सरकार तीन महिन्यांपर्यंत वाढवू शकते. हा कालावधी वाढविताना एकूण कालावधी हा कलम 10 मधील कालावधीशी सुसंगत असेल. या सुधारणेबाबतचा अध्यादेश काढण्यात येईल.
Read Moreबाजार समितीच्या निवडणूकीमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
799 Views प्रतिनिधि। मुंबई, (14 जुलै).राज्यातील बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना बाजार समितीच्या निवडणूकांमध्ये थेट मतदान करता येईल असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. त्यासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे दहा आर इतकी जमीन असेल अशा १८ वर्षांहून अधिक वय असलेल्या आणि पाच वर्षांमध्ये किमान तीन वेळा संबंधित बाजार समितीत आपल्या कृषी मालाची विक्री केली असेल, अशा शेतकऱ्याला थेट मतदान करता येईल. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील सर्व खातेदार शेतक-यांना थेट मतदानाचा अधिकार दिल्यामुळे सात-बारा…
Read Moreनगराध्यक्ष आणि सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार, शिंदे सरकारचा आजच्या कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
1,095 Views मुंबई। राज्यातील एकनाथ शिंदे सरकारने ठाकरे सरकारचे निर्णय पुन्हा बदलणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहे. यापैकी महाराष्ट्रातील सरपंचांची आणि नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय नव्या सरकारने घेतला आहे. ठाकरे सरकारने जनतेतून सरपंचांच्या आणि नगराध्यक्षांच्या निवडीचा निर्णय बदलला होता. या व्यतिरिक्त बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना अधिकार देण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे.
Read Moreनगरपंचायत गोरेगाव च्या नविन प्रशासकीय इमारती साठी 15 कोटी चा निधी उपलब्ध करा..
1,316 Views आमदार विजय रहांगडाले व माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी.. प्रतिनिधि।13 जुलै मुंबई। आज दिनांक 13 जुलै 2022 ला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आमदार विजय रहांगडाले यांच्या नेतृत्वात माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी गोरेगाव नगरपंचायत च्या भव्य प्रशासकीय इमारती करिता पंधरा कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन दिले व याबद्दल चर्चा केली. त्यावर तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशाषनाला निर्देश दिलेले आहेत. सद्यस्थितीमध्ये नगरपंचायत कार्यालय ज्या इमारतीमध्ये आहे ती इमारत ग्रामपंचायतची जुनी इमारत असून बाजूची 2005 मध्ये बनलेली नवीन…
Read More