717 Views
आमदार विजय रहांगडाले व माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी..
प्रतिनिधि।13 जुलै
मुंबई। आज दिनांक 13 जुलै 2022 ला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आमदार विजय रहांगडाले यांच्या नेतृत्वात माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी गोरेगाव नगरपंचायत च्या भव्य प्रशासकीय इमारती करिता पंधरा कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन दिले व याबद्दल चर्चा केली. त्यावर तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशाषनाला निर्देश दिलेले आहेत.
सद्यस्थितीमध्ये नगरपंचायत कार्यालय ज्या इमारतीमध्ये आहे ती इमारत ग्रामपंचायतची जुनी इमारत असून बाजूची 2005 मध्ये बनलेली नवीन इमारत निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे अत्यंत जिर्णवस्थेमध्ये असल्यामुळे कर्मचारी व नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालेली आहे त्यामुळे सर्व सोयी सुविधा युक्त आधुनिक नवीन (ग्रीन बिल्डिंग) इमारतचे निर्माण व्हावे अशी मागणी अनेक दिवसापासून नगरपंचायतीच्या पदाधिकारी व माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार व नागरिकांची यांनी नगरपंचायत प्रशासनाला केली होती.
त्याचे तात्काळ कार्य होणाच्या दृष्टीने तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार विजय रहांगडाले यांना ही बाब लक्षात आणून देण्यात आली व याबाबत त्यांनी तातडीचे निर्णय घेऊन उपमुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले तर नगर प्रशासन तर्फे लवकरच प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे अशी माहिती मिळालेली आहे.
माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी सांगितले कि गोरेगाँव च्या विकासासाठी मागील अडीच वर्षापासून कोणताही नवीन निधी देण्यात आला नसुन सत्तांतर होताच शहराच्या विकासाला नवीन वेग येण्याची आशा प्रफ्फुलित झाली आहे.