551 Views गोंदिया,दि.21ः- मागील 6 वर्षांपासून ओबीसी विद्यार्थ्यांच्या 72 वसतीगृहाचा विषय शासनाने अजूनही सोडवला नाही. राज्य शासनाचा वित्त विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग आताही गंभीर नाही. यामुळे पुन्हा एकदा ओबीसी विद्यार्थी वसतिगृहे आणि आधार योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.त्यामुळे आज 21 सप्टेबंरला गोंदियातील जयस्तंभ चौक परिसरात भीक मांगो आंदोलन करुन गोळा झालेला निधी मनिआर्डरच्या माध्यमातून राज्य सरकारला पाठविला. शाळा महाविद्यालये सुरू होवून 3 महिने उलटले आहेत तरी 7200 विद्यार्थ्यांसाठी 72ओबीसी वसतिगृहे, 21600 विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले आधार योजना, 75 विद्यार्थ्यांसाठी विदेश शिष्यवृत्ती योजना यावर निर्णय झालेला असतांना अजूनही वरील…
Read MoreCategory: मराठी बातम्या
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज गोंदियात, संपर्क से समर्थन अभियान व कार्यकर्ता मेळाव्यात होणार सहभागी…
426 Views गोंदिया : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे 26 ऑगस्ट रोजी जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत. दौर्यादरम्यान सायंकाळी 4.45 वाजता कुडवा नाका येथे आगमन झाल्यावर स्वागत, 5 वाजता शहरातील गांधी प्रतिमा चौकात स्वागत व त्यानंतर ते शहरातील मुख्य मार्गाने रॅलीद्वारे ‘संपर्क से समर्थन’ यातंर्गत घर चलो अभियानात सहभागी होतील. सायंकाळी 6 ते 7 वाजता दरम्यान नियोजित ठिकाणी भेटी व 7 वाजता पवार बोर्डिंग येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधून मार्गदर्शन करतील.
Read Moreअन् माजी मंत्री गहिवरले, मृतक कुटुंबियांची सांत्वनपर भेट..
759 Viewsअर्जुनी मोर. :- आईचा दुर्दैवी मृत्यु झाला. याची पुसटसीही कल्पना नसलेला सहा महिण्याचा निरागस बाळ आईवीना पाळण्यात निवांत झोपलेला आहे. हे दृश्य पाहून राज्याचे माजी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री राजकुमार बडोले अत्यंत गहिवरले. यावेळी उपस्थितांचेही डोळे पाणावले. अर्जुनी मोर. तालुक्यातील प्रतापगड गटग्रामपंचायत अंतर्गत कढोली येथील वर्षा रविंद्र कुंभरे या 30 वर्षीय विवाहितेचा ता.10 ऑगस्ट रोजी शेतात काम करीत असताना अचानक सर्पदंशाने मृत्यु झाला.मृतक महिलेला दोन मुले असुन लहान मुलगा केवळ सहा महिण्याचाच आहे. आपली आई जगात नाही याची कल्पना नसलेला हा बाळ आईच्या दुधाविना पाळण्यात झोपतो.हे दृश्य…
Read Moreआयटीआय प्रशिक्षणार्थीना, आता दरमहा ५०० रुपये मिळणार
685 Views मुंबई। शासकीय आयटीआयमधील प्रशिक्षणार्थीना विद्यावेतनात ४० रुपयांवरुन ५०० रुपये अशी भरीव वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षणार्थ्यांना १९८३ पासून ४० रुपये इतके विद्यावेतन शैक्षणिक साहित्याकरीता व इतर आवश्यक खर्चाकरीता देण्यात येते. या विद्यावेतनात मागील ४० वर्षात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. वाढत्या महागाई दराच्या व शैक्षणिक साहित्यामध्ये खर्चामध्ये झालेल्या वाढीनुसार विद्यावेतनात वाढ करण्याची मागणी सातत्याने लोकप्रतिनिधी व प्रशिक्षणार्थीकडून करण्यात येत होती. या निर्णयामुळे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष…
Read Moreमंत्रिमंडळ निर्णय: गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा
894 Views मुंबई। (18), राज्यातील शिधापत्रिकाधारकाना गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर खाद्यतेल असा हा शिधा अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) व केशरी शिधापत्रिकाधारकांना देण्यात येईल. हा शिधा जिन्नस १९ सप्टेंबर रोजी गौरी गणपती उत्सवानिमित्त व त्यानंतर १२ नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या दिवाळी निमित्त वितरित करण्यात येईल. राज्यातील एकूण १…
Read More