अन् माजी मंत्री गहिवरले, मृतक कुटुंबियांची सांत्वनपर भेट..

423 Views

अर्जुनी मोर. :- आईचा दुर्दैवी मृत्यु झाला. याची पुसटसीही कल्पना नसलेला सहा महिण्याचा निरागस बाळ आईवीना पाळण्यात निवांत झोपलेला आहे. हे दृश्य पाहून राज्याचे माजी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री राजकुमार बडोले अत्यंत गहिवरले. यावेळी उपस्थितांचेही डोळे पाणावले.

अर्जुनी मोर. तालुक्यातील प्रतापगड गटग्रामपंचायत अंतर्गत कढोली येथील वर्षा रविंद्र कुंभरे या 30 वर्षीय विवाहितेचा ता.10 ऑगस्ट रोजी शेतात काम करीत असताना अचानक सर्पदंशाने मृत्यु झाला.मृतक महिलेला दोन मुले असुन लहान मुलगा केवळ सहा महिण्याचाच आहे. आपली आई जगात नाही याची कल्पना नसलेला हा बाळ आईच्या दुधाविना पाळण्यात झोपतो.हे दृश्य जो कुणी पहातो त्यांचे मन हेलावून टाकणारी ही घटना आहे.

ही माहिती मिळताच माजी मंत्री राजकुमार बडोले हे दि.17 ऑगस्ट ला कढोली येथे मृतकाच्या घरी गेले.व कुटुंबियांची भेट घेवुन सात्वंन केले.आम्ही तुमच्या दु:खात सहभागी असुन या सहा महिण्याचे बाळाचे चांगल्याप्रकारे संगोपन करुन काळजी घेण्याविषयी सांगीतले. याच बरोबर थोडीफार आर्थीक मदत सुध्दा केली. सोबतच शासनाकडून मिळणारे लाभ यासाठी आपण प्रयत्न करु असे आश्वासन दिले. यावेळी भोजराम लोगडे,लक्ष्मीकांत धानगाये,राजहंस ढोके,तसेच अन्य कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related posts