भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज गोंदियात, संपर्क से समर्थन अभियान व कार्यकर्ता मेळाव्यात होणार सहभागी…

187 Views

 

गोंदिया : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे 26 ऑगस्ट रोजी जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. दौर्‍यादरम्यान सायंकाळी 4.45 वाजता कुडवा नाका येथे आगमन झाल्यावर स्वागत, 5 वाजता शहरातील गांधी प्रतिमा चौकात स्वागत व त्यानंतर ते शहरातील मुख्य मार्गाने रॅलीद्वारे ‘संपर्क से समर्थन’ यातंर्गत घर चलो अभियानात सहभागी होतील.

सायंकाळी 6 ते 7 वाजता दरम्यान नियोजित ठिकाणी भेटी व 7 वाजता पवार बोर्डिंग येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधून मार्गदर्शन करतील.

Related posts