NH-6 वर सौंदड उड्डाण पुलाला डॉ बाबासाहेब आंबेडकर नामकरण द्या, ग्राम सभेचे ठराव मंजूर..

370 Views

 

सरपंच हर्ष मोदी यांना गावकऱ्यांचा मिळाला उत्कृष्ट प्रतिसाद, ओबीसी जातीनिहाय जनगणना साठी ग्राम सभेचा ठराव पारित

प्रतिनिधि। 25 ऑगस्ट

गोंदिया/ आज दिनांक २५ ऑगस्ट २०२३ रोजी ग्राम पंचायत सौंदड येथे आयोजित ग्राम सभेत सरपंच हर्ष विनोदकुमार मोदी यांनी अनेक सामाजिक मुद्दे मांडले. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील रेल्वे उड्डाण पुलाला डॉ. बी. आर. आंबेडकर नामकरण करणे, सौंदड येथील ग्रामीण रुग्णालयाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नामकरण करण्याबाबतचे विषय मांडले. संपूर्ण देशभरात ओबीसी जनगणनेचा मुद्दा ओबीसी समाजाने उचलून धरला आहे. याला समर्थन देत ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी यासाठी सुद्धा या ग्रामसभेत विषय चर्चेला मांडण्यात आला.

या सर्व निर्णयांना नागरिकांनी हर्ष मोदी यांना समर्थन दर्शवत भरघोस असा प्रतिसाद देत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे, गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री परिणय फुके, माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले भाजप जिल्हा संघटक वीरेंद्र अंजनकर यांच्या माध्यमातून तात्काळ मागणी पूर्ण करण्यासाठी ठरावाची प्रत सुपूर्त करण्यात येईल. अशी माहिती सरपंच हर्ष मोडी यांनी दिली.

यावेळी ग्रामपंचायत सरपंच हर्ष मोदी, उपसरपंच भाऊराव यावलकर ग्रामपंचायत सदस्य, ग्राम विकास अधिकारी, आशा सेविका अंगणवाडी शिक्षिका व ४५० पेक्षा जास्त नागरिक उपस्थित होते.

Related posts