गोठणपार येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा NAPF गोंदियाच्या वतीने जाहीर निषेध- करण टेकाम

1,045 Views  गोंदिया :: लोकशाहीचा उत्सव संपूर्ण जिल्हा साजरा करीत असताना मानवतेला काळिमा फासणारी घटना देवरी तालुक्यातील गोठणपार येथे आदिवासी समुदायातील अल्पवयीन मुलगी लग्न समारंभ करिता आली असता तिचे अपहरण करून लैगिक अत्याचार करून हत्या करण्यात आली. या घटनेचा नेशनल आदिवासी पीपल फेडरेशन, नेशनल आदिवासी कर्मचारी फेडरेशन , आदिवासी विध्यार्थी संघ , महिला फेडरेशन , बिरसा ब्रिगेड व विविद्द सामाजिक संघटन गोंदियाच्या वतीने गोंदिया जिल्हा अधिकारी आणि पोलीस अधीक्षक गोंदिया यांना निवेदन देण्यात आला. आरोपीचा तपास करून त्यांच्यावर कठोर कारवाही करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यातील महिलांच्या अत्याचाराच्या…

Read More

डॉ.फुके यांच्या प्रयत्नामुळे आशा सेविकांच्या मानधनात वाढ, आता मिळणार 13 हजार रुपये दरमहा…

1,343 Views  डॉ.परिणय फुके यांनी राज्यातील यशस्वी सरकारचे मानले आभार… 13 मार्च/ प्रतिनिधी गोंदिया. आज, मुंबई मंत्रालय येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत माजी मंत्री डॉ.परिणय फुके यांनी मांडलेली राज्यातील आशा वर्कर्सच्या मानधनात वाढ करण्याची मागणी शासनाने मान्य करून त्यांच्या मानधनात 5000 रु.भरीव वाढ करून त्यांना न्याय देंण्याचा कार्य केलं आहे. माजी राज्यमंत्री तथा गोंदिया-भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके म्हणाले, आरोग्य यंत्रणेचा कणा समजल्या जाणाऱ्या आशा सेविकांच्या मानधनात आज शासनाने वाढ करून न्याय दिला आहे. राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. श्री.फुके…

Read More

मंत्रिमंडल निर्णय: शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव बंधनकारक

853 Views             मुंबई। शासकीय दस्तऐवजांमध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शविता उमेदवाराचे नांव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरुपात नोंदविण्याचे बंधनकारक करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.             १ मे, २०२४ रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंद बालकाचे नाव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरुपात सर्व शैक्षणिक कागदपत्रे, महसूली दस्तऐवज, वेतन चिठ्ठी, सेवापुस्तक, विविध परीक्षांच्या अर्जाचे नमुने इत्यादी शासकीय दस्तऐवजामध्ये बंधनकारक करण्यास मान्यता देण्यात आली आहे.             सार्वजनिक आरोग्य विभागाने जन्म-मृत्यू नोंदवहीत आवश्यक त्या…

Read More

शासनाकडे जेवढे मागितले त्यापेक्षा जास्त मिळाला बोनस – माजी पालकमंत्री डॉ. फुके

1,585 Views  शासनाचा निर्णय : धान विक्री केली असो किंवा नसो, नोंदणीकृत शेतकऱ्यांना मिळणार दोन हेक्टरपर्यंत 40 हजार रुपये बोनस.. गोंदिया/भंडारा. 27 फेब्रुवारी राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा यशस्वी ट्रिपल इंजिन सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न साकार करून महाराष्ट्राला सुजलाम-सुफलाम आणि उज्ज्वल करण्यासाठी कार्य करत आहे. राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या विकासासोबतच आर्थिक समस्यांना तोंड देत असलेला शेतकरीही आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हावा यासाठी शासन अनेक प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. या मदतीअंतर्गत राज्याच्या ट्रिपल इंजिन सरकारने पुन्हा एकदा सहानुभूती दाखवत शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी…

Read More

गोंदिया जिल्ह्यातील ४४४ मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवन व दुरुस्तीसाठी ५७.६१ कोटी

1,010 Views  विदर्भातील माजी मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष मोहीम राबवा– मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड मुंबई दि. 26 – माजी मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन हा विदर्भासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प असून विशेष मोहीम राबवून उत्तम गुणवत्तेची कामे करण्याचे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले. विदर्भात एकूण अंदाजे नऊ हजार २८० माजी मालगुजारी  तलाव आहेत. सन २०२३-२४ मध्ये विदर्भातील व मराठवाड्यातील एक हजार 649 माजी मालगुजारी तलावांचे पुनरूज्जीवन व दुरूस्ती प्रस्तावित आहे. सध्या प्रस्तावित तीन वर्षाच्या नियोजनानुसार दोन हजार 398 माजी मालगुजारी तलावांच्या दुरूस्तीबाबत नियोजन करण्याचे निश्च‍ित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात एक हजार 106 प्रस्तावास मान्यता देणेबाबत मंत्री श्री. राठोड…

Read More