2,185 Views नागरिकांचे प्रश्न जलदगतीने सोडण्यासाठी होईल मदत, आतापर्यंत ३० अर्ज प्राप्त -स्मिता बेलपत्रे गोंदिया दि. २४ : जिल्ह्यातील नागरिकांचे दैनंदिन प्रश्न, शासनस्तरावर असलेली कामे आणि त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने स्वीकारण्यासाठी गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री सचिवालय कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कक्षाला आतापर्यंत ३० अर्ज प्राप्त झाले असून ते संबंधित विभागाला पाठविण्यात आले आहेत. या अर्जाचा नियमितपणे पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व सामान्य माणसाला आपले प्रश्न व समस्या, अर्ज तसेच निवेदन देण्यासाठी मंत्रालयात जावे लागायचे. यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा खर्च व्हायचा.…
Read MoreCategory: मराठी बातम्या
दोन दिवसीय गोंदिया जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन २२ फेब्रुवारीला
745 Views दोन दिवस साहित्य मेजवानी •पुस्तक प्रेमींसाठी पुस्तकांचे स्टॉल गोंदिया,दि.21 : उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी गोंदिया यांच्या वतीने २२ व २३ फेब्रुवारी २०२३ ला श्री. गुरुनानक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अग्रसेन गेट जवळ, गोंदिया येथे दोन दिवसीय ग्रंथोत्सव व पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ग्रंथोत्सवाची सुरुवात बुधवार २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडीने होणार आहे. ग्रंथोत्सवाचे उद्घाटन ११ वाजता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते राहणार आहेत. अशी माहिती प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अस्मिता मंडपे यांनी…
Read Moreखा. प्रफुल पटेल व वर्षाताई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम सम्पन्न, असंख्य लोकांना घेतला आरोग्य शिबिराचा लाभ, शेकडो युवकांचा रक्तदान तर गरजूंना उपयोगी साहित्य वाटप..
862 Views प्रतिनिधि।(17फेब्रुवरी) गोंदिया। राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय नेते खा. प्रफुल पटेल व सौ.वर्षाताई पटेल यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गोंदिया शिक्षण संस्था व विविध सामाजिक संस्थाच्या वतीने जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाढदिवसानिमित्त आज श्री कृष्ण गौरक्षण (गौशाला) गोंदिया येथे माजी आमदार राजेंद्र जैन यांनी गौमातेचे पूजन करून खासदार प्रफुल पटेल व सौ. वर्षाताई पटेल यांना दीर्घायुष्य व निरोगी जीवन लाभो अशी गौमातेच्या चरणी प्रार्थना केली. दरम्यान झालेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून असंख्य गरजू लाभार्थ्यांनी आरोग्य निदान शिबीराचा लाभ घेतला तर शेकडो युवकांनी ठीक ठिकाणच्या शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान केले. त्याचप्रमाणे…
Read Moreखा. प्रफुल पटेल व सौ. वर्षाताई पटेल वाढदिवसानिमित्त आरोग्य निदान व रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद
1,498 Views पुंजाभाई पटेल शिक्षण महाविद्यालय येथे कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न गोंदिया। (17 फेब्रुवरी). आज स्थानिक पुंजाभाई पटेल शिक्षण महाविद्यालयात खा. प्रफुल पटेल व सौ.वर्षाताई पटेल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुंजाभाई पटेल शिक्षण महाविद्यालय व बाहेकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर च्या वतीने आरोग्य निदान व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून माजी आमदार व गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्र जैन, गोंदिया शिक्षण संस्थेचे संचालक निखिल जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. या शिबिराला गोंदियाचे…
Read Moreगोंदिया: राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये १३ हजार ८३७ प्रकरणांचा यशस्वी निपटारा, पक्षकारांनी केले समाधान व्यक्त
632 Viewsगोंदिया दि. १२ । वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित असलेले खटले समोपचाराने व सामंजस्याने तात्काळ निकाली काढण्याकरीता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे निर्देशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदियाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय लोक अदालतमध्ये १३ हजार ८३७ प्रकरणांचा यशस्वी निपटारा करण्यात आला. यावेळी ५ कोटी ५० लाख ७३ हजार ४९२ रुपये एवढी वसुली झाली. अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. टी. वानखेडे, एस. सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण एस. व्ही. पिंपळे यांचे मार्गदर्शनाखाली ११ फेब्रुवारी २०२३…
Read More