खा. प्रफुल पटेल व वर्षाताई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम सम्पन्न, असंख्य लोकांना घेतला आरोग्य शिबिराचा लाभ, शेकडो युवकांचा रक्तदान तर गरजूंना उपयोगी साहित्य वाटप..

479 Views

 

प्रतिनिधि।(17फेब्रुवरी)

गोंदिया। राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय नेते खा. प्रफुल पटेल व सौ.वर्षाताई पटेल यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गोंदिया शिक्षण संस्था व विविध सामाजिक संस्थाच्या वतीने जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाढदिवसानिमित्त आज श्री कृष्ण गौरक्षण (गौशाला) गोंदिया येथे माजी आमदार राजेंद्र जैन यांनी गौमातेचे पूजन करून खासदार प्रफुल पटेल व सौ. वर्षाताई पटेल यांना दीर्घायुष्य व निरोगी जीवन लाभो अशी गौमातेच्या चरणी प्रार्थना केली. दरम्यान झालेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून असंख्य गरजू लाभार्थ्यांनी आरोग्य निदान शिबीराचा लाभ घेतला तर शेकडो युवकांनी ठीक ठिकाणच्या शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान केले. त्याचप्रमाणे ठीक ठिकाणी फळवाटप तर कुठे विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप, मंगलम मूक बधिर निवासी शाळा येथील मुलांना भोजन, शिवाय रोजगार शिबीर, प्रेरक मार्गदर्शन (मोटिव्हेशनल) व भजन संध्या चे आयोजन करण्यात आले. वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रम माजी आमदार राजेंद्र जैन तसेच स्थानिक पदाधिकारी व मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

उल्लेखनीय असे कि खासदार प्रफुल पटेल व सौ.वर्षाताई पटेल यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर व नागरिकांनी खा.श्री प्रफुल पटेल व सौ.वर्षाताई पटेल यांना दीर्घायुष्य व निरोगी जीवनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.


खासदार प्रफुल पटेल व सौ. वर्षाताई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी गोंदिया येथील एन एम डी कॉलेज येथे प्रेरक मार्गदर्शन श्री आशिष दिवाण यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी, कंपन्यांची मुलाखत, मुलाखती पूर्व तयारी आणि देश विदेशातील उद्योग या संदर्भात मार्गदर्शन केले.

या शिबीरात असंख्ये विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उदघाटन माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विशेष अतिथी म्हणून गोंदिया शिक्षण संस्थेचे संचालक श्री निखिल जैन उपस्थित होते, यावेळी सोच सेवा संस्था च्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात विद्यार्थी व प्राध्यापकांनी रक्तदान केले. तसेच नगर परिषद शाळा छोटा गोंदिया येथे बाल रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात बाळ रोग डॉक्टरांकडून बालकांची तपासणी करून औषधी वाटप करण्यात आली. या शिबिराला नागरिकांनी भरघोष प्रतिसाद दिला.

पी. पी. कॉलेज, कुंभारे नगर, गोंदिया येथे आयोजित रक्तदान व आरोग्य तपासनी शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात असंख्ये नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली त्याचप्रमाणे रक्तदान शिबिरात शेकडो युवक सहभागी झाले होते. गोंदिया शिक्षण संस्था संचालित एस. एस. गर्ल्स कॉलेज, गोंदिया येथे शैक्षणिक प्रदर्शनी व योगा शिविराचे आयोजन करण्यात आले यावेळी विद्यार्थी व प्राध्यापकांनी शैक्षणिक प्रदर्शनासाठी प्रयोग मांडले होते. तसेच डी. बी. सायन्स कॉलेज, गोंदिया येथे मोटिवेशनल स्पीच श्री चरणलक्की राज, हैद्राबाद यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गोंदिया शहरातील त्रिवेणी स्कूल, श्रीनगर, येथे शालेय उपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले. मयूर लॉन, ग्राम कटंगी येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराला परिसरातील रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला. फुलचूर येथे मंगलम मूक बधिर निवासी शाळा येथील मुलांना भोजन, पोवार बोर्डिंग, गोंदिया येथे युवक काँग्रेस च्या वतीने यूथ फेस्टिवल कार्यक्रम घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालय, गोंदिया येथे फळ वितरण करण्यात आले. वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे उदघाटन माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय चमू, पक्ष पदाधिकरी गणमान्य नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

खा. प्रफुल पटेलजी व सौ. वर्षाताई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस भवन, रेलटोली, गोंदिया येथे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत केक कापून खासदार पटेल यांच्या शुभचिंतकांनी दीर्घायुष्यासाठी अभीष्टचिंतन केले.

Related posts