607 Views गोंदिया, दि.1 : शासकीय आधारभुत धान खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 2022-23 मधील धान खरेदीकरीता देण्यात आलेले उद्दिष्ट अद्यापही पूर्ण झाले नसल्याने शासनाने खरीप हंगामासाठी धान खरेदीची मुदत 8 मार्च 2023 पर्यंत दिलेली आहे. करीता नोंदणी झालेल्या उर्वरित सर्व शेतकऱ्यांनी दिनांक 8 मार्च 2023 पर्यंत आपल्या तालुक्यातील जवळच्या खरेदी केंद्रावर जाऊन धान विक्री पूर्ण करुन घ्यावी. धान विक्रीसाठी देऊन शासनाच्या धान खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी, गोंदिया यांनी केले आहे.
Read MoreCategory: मराठी बातम्या
भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 4 मार्च ला, गोंदिया जिल्ह्यात, अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रात कबड्डी स्पर्धा, बक्षीस वितरण, पक्ष प्रवेश व कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थिति
817 Views गोंदिया, 28 फेब्रुवारी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात प्रथमच 4 मार्च रोजी आगमन होत आहे. यानिमित्त माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या मार्गदर्शनात दुपारी 2 वाजता विधानसभा क्षेत्रातील शक्ती केंद्रस्तरीय कबड्डी स्पर्धा, परीक्षा पे चर्चा स्पर्धेचे बक्षीस वितरण, धन्यवाद मोदीजी पोस्टकार्ड, पक्ष प्रवेश व कार्यकर्ता मेळावा कार्यक्रमाचे आयोजन एसएसजे महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्धाटन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येईल. प्रमुख अतिथी म्हणून खा. सुनील मेंढे, माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके, विदर्भ…
Read More‘‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’’ च्या सायकल संडे ग्रुप द्वारे जनजाग्रुती सायकल रॅली, अनेकांनी घेतला सहभाग…
1,190 Viewsगोदिया:- या वर्ष हे ‘‘अंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’’ म्हणुन साजरे करण्यात येत आहे. या माध्यमातून पौष्टिक तृणधान्य पिकांच्या उत्पादन वाढी सोबतच पिकांच्या आरोग्य विषयक फायद्यांन बाबत जनजागृती करून नागरिकांच्या आहारात तसेच त्यांचे प्रमाण वाढविण्यांचे प्रयत्न कृषी विभागाकडुन होत आहे. या पौष्टिक तृणधान्य पिकातील पोषण मुल्य व त्यांच्या सेवनामुळे आरोग्यावर सकारात्मक होणारे परिणाम जन सामान्य प्रयन्त तसेच त्यांच्या लक्षात येण्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, गोंदिया व सायकलिंग संडे गोंदिया ग्रुप सोबत संयुक्त २६ फेब्रुवारी ला सकाळी ६ वाजे जय स्थंभ चौक गोंदिया येथुन सायकल रॅली ची सुरवात केली. गोंदिया शहरात…
Read Moreआता मुंबई जाण्याची गरज नाही, जिल्हाधिकारी कार्यालयात शुरू झाले मुख्यमंत्री सचिवालय कक्ष
2,102 Views नागरिकांचे प्रश्न जलदगतीने सोडण्यासाठी होईल मदत, आतापर्यंत ३० अर्ज प्राप्त -स्मिता बेलपत्रे गोंदिया दि. २४ : जिल्ह्यातील नागरिकांचे दैनंदिन प्रश्न, शासनस्तरावर असलेली कामे आणि त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने स्वीकारण्यासाठी गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री सचिवालय कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कक्षाला आतापर्यंत ३० अर्ज प्राप्त झाले असून ते संबंधित विभागाला पाठविण्यात आले आहेत. या अर्जाचा नियमितपणे पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व सामान्य माणसाला आपले प्रश्न व समस्या, अर्ज तसेच निवेदन देण्यासाठी मंत्रालयात जावे लागायचे. यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा खर्च व्हायचा.…
Read Moreदोन दिवसीय गोंदिया जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन २२ फेब्रुवारीला
653 Views दोन दिवस साहित्य मेजवानी •पुस्तक प्रेमींसाठी पुस्तकांचे स्टॉल गोंदिया,दि.21 : उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी गोंदिया यांच्या वतीने २२ व २३ फेब्रुवारी २०२३ ला श्री. गुरुनानक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अग्रसेन गेट जवळ, गोंदिया येथे दोन दिवसीय ग्रंथोत्सव व पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ग्रंथोत्सवाची सुरुवात बुधवार २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडीने होणार आहे. ग्रंथोत्सवाचे उद्घाटन ११ वाजता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते राहणार आहेत. अशी माहिती प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अस्मिता मंडपे यांनी…
Read More