गोदिया:- या वर्ष हे ‘‘अंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’’ म्हणुन साजरे करण्यात येत आहे. या माध्यमातून पौष्टिक तृणधान्य पिकांच्या उत्पादन वाढी सोबतच पिकांच्या आरोग्य विषयक फायद्यांन बाबत जनजागृती करून नागरिकांच्या आहारात तसेच त्यांचे प्रमाण वाढविण्यांचे प्रयत्न कृषी विभागाकडुन होत आहे.
या पौष्टिक तृणधान्य पिकातील पोषण मुल्य व त्यांच्या सेवनामुळे आरोग्यावर सकारात्मक होणारे परिणाम जन सामान्य प्रयन्त तसेच त्यांच्या लक्षात येण्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, गोंदिया व सायकलिंग संडे गोंदिया ग्रुप सोबत संयुक्त २६ फेब्रुवारी ला सकाळी ६ वाजे जय स्थंभ चौक गोंदिया येथुन सायकल रॅली ची सुरवात केली.
गोंदिया शहरात व गोंदिया शहराच्या आजू बाजूला सुध्दा सायकलन ने फिरून ‘‘अंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’’ ठिकाणी – ठिकाणी या बदल माहिती दिली.
या सायकल रॅली मध्ये जिल्हयातील कृषी विभागातील अधिकारी/कर्मचारी व तसेच गोंदिया शहर येथील सायंकालीन संडे ग्रुप तसेच महिला पुरुष यांनी देखील सहभाग घेतला तसेच ‘‘अंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’’ लोगो असलेले टिर्शट परिधान करून पौष्टिक तृणधान्य बाबत जनजागृती केली.