महात्मा जोतिराव फुले, आयुष्मान भारत आरोग्य योजनेचे एकत्रिकरण,आता दीड लाखांऐवजी ५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण

451 Views मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला निर्णय.. मुंबई। राज्यातील महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना आणि केंद्राची आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांचे एकत्रिकरण करून, यात नागरिकांना आरोग्य संरक्षण ५ लाख रुपये एवढे करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सध्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेत दिड लाखांपर्यंत उपचाराची खर्च मर्यादा आहे. सुमारे २ कोटी कार्डसचे वाटप करण्यात येणार असून, रुग्णालयांची संख्या देखील वाढवण्यात येणार आहे.             या जन आरोग्य योजनेत सध्या मूत्रपिंड शस्त्रकियेसाठी असलेली अडीच लाख रुपयांची उपचार खर्चाची मर्यादा वाढवून ती साडे…

Read More

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यासाठी २१० कोटी

505 Views  मुंबई। राज्यात ७०० ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यासाठी पुरवणी मागण्यांद्वारे २१० कोटी १ लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यास येईल. सध्या असे दवाखाने मुंबईत १५५ ठिकाणी सुरु आहेत. त्यातून ७ लाख ४३ हजार ५७० रुग्णांना सेवा देण्यात आली आहे.             येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणी मांडण्यात येईल. या योजनेसाठी पुढील चार वर्षांसाठी लागणाऱ्या निधीची देखील तरतूद करण्यास मान्यता देण्यात आली. मुंबई महापालिकेच्या धर्तीवरच संपूर्ण राज्यात हे दवाखाने सुरु करण्यात येतील.…

Read More

गोंदिया: स्कुल बस वाहनाचे वैध कागदपत्राशिवाय विद्यार्थी वाहतूक करू नये – राजवर्धन करपे

495 Views          गोंदिया, दि.27 :- सर्व स्कुलबस चालक व मालक यांनी आपले स्कुल बस वाहनांचे सर्व कागदपत्रे जसे- नोंदणी प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, परवाना, विमा व प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र इत्यादी तसेच चालकाची अनुज्ञप्ती व बॅज वैध असल्याशिवाय विद्यार्थी वाहतुकीसाठी रस्त्यावर वापरु नये, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी केले आहे. याकरिता उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत विशेष शिबीर आयोजित करण्यात येत असून सर्व स्कुल बस धारकांनी त्याचा लाभ घ्यावा. जिल्हयातील सर्व शाळा व्यवस्थापन व पालकांनी विद्यार्थ्यांची वाहतुक केवळ वैध कागदपत्रे असलेल्या स्कुलबस मधुनच होईल याची दक्षता घ्यावी. स्कुल बस नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या दोषी वाहनांवर…

Read More

गोंदिया: पोलीस पाटलांनी सतर्क राहून कार्य करावे, PI सचिन म्हेत्रे यांचे आवाहन

622 Views  गोंदिया-(ता.18) मागच्या अनेक दिवसापासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात चोरी व घरफोडीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या प्रकारावर आळा घालण्यासाठी गाव पातळीवर कार्य करणाऱ्या पोलीस पाटलांनी ग्राम सुरक्षादलाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सतर्कतेने कार्य करावे असे आवाहन गोंदिया ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी केले. ते शनिवारी( ता.17) ग्रामीण पोलीस स्टेशन च्या आवारात पोलीस पाटलांच्या मासिक सभेत बोलत होते. मागच्या काही दिवसापासून ग्रामीण भागात चोरी व घरफोडीचे प्रमाण वाढले आहे. पोलीस विभागही आपल्या परीने रात्री ग्रस्त करून या घटनांना पायबंद घालीत आहे. तरीपण या घटनांवर पूर्णपणे आळा घालण्यासाठी गावातील पोलीस पाटील…

Read More

सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी 1500 कोटी रुपयांस मंजुरी

370 Views मुंबई। गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे बाधीत शेतकऱ्यांना 1500 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.  सुमारे 15.96 लाख हेक्टर बाधित क्षेत्रातील 27.36 लाख शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येईल.             सततचा पाऊस ही राज्य शासनामार्फत नवीन आपत्ती घोषित करुन मदत देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या 5 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे शेतीपिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने व निकषानुसार मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.             केंद्र शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे दर सुधारित केले आहेत.  त्यानुसार जिरायत पिकांच्या…

Read More