गोंदिया: स्कुल बस वाहनाचे वैध कागदपत्राशिवाय विद्यार्थी वाहतूक करू नये – राजवर्धन करपे

184 Views

         गोंदिया, दि.27 :- सर्व स्कुलबस चालक व मालक यांनी आपले स्कुल बस वाहनांचे सर्व कागदपत्रे जसे- नोंदणी प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, परवाना, विमा व प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र इत्यादी तसेच चालकाची अनुज्ञप्ती व बॅज वैध असल्याशिवाय विद्यार्थी वाहतुकीसाठी रस्त्यावर वापरु नये, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी केले आहे.

याकरिता उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत विशेष शिबीर आयोजित करण्यात येत असून सर्व स्कुल बस धारकांनी त्याचा लाभ घ्यावा. जिल्हयातील सर्व शाळा व्यवस्थापन व पालकांनी विद्यार्थ्यांची वाहतुक केवळ वैध कागदपत्रे असलेल्या स्कुलबस मधुनच होईल याची दक्षता घ्यावी.

स्कुल बस नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या दोषी वाहनांवर विशेष तपासणी मोहिमेद्वारे कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Related posts