1,295 Views गोंदिया : केंद्र शासनाच्या रेल्वे मंत्रालयाने देशातील रेल्वे स्टेशन अधिक सुविधायुक्त होवून आधुनिक व्हावे, यासाठी अमृत भारत स्टेशन योजना हाती घेतली. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात गोंदिया रेल्वेस्थानकाचा समावेश करण्यात आला होता. त्याचबरोबर भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील इतर रेल्वेस्थानकांचेही कायापालट व्हावे, यासाठी खा.प्रफुल पटेल यांनी प्रयत्न केले. दरम्यान या योजनेच्या दुसर्या टप्प्यात गोंदिया जिल्ह्यातील आमगाव व भंडारा येथील वरठी तसेच तुमसर रेल्वे स्टेशनचा समावेश करण्यात आला आहे. यानुरूप रेल्वे प्रशासनाने तिन्ही स्थानकांचा कायापालट करण्याचे नियोजनही केले आहे. त्यामुळे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील जनतेचा रेल्वे प्रवास आणखी सोयीस्कर होणार आहे.…
Read MoreCategory: भंडारा
गोंदियासह पूर्व-विदर्भ क्षेत्रात वादळी पावसाची शक्यता, हवामान तज्ज्ञांचा अंदाज
1,739 Views मुंबई, दि.23 : पूर्व विदर्भ क्षेत्रात 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रविवार 25 फेब्रुवारी रोजी दुपारनंतर गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळाची शक्यता आहे. मुख्यत: सोमवार दि. 26 फेब्रुवारी रोजी दुपारनंतर हवामानातील बदल अपेक्षीत आहे. या तीन जिल्ह्यांसह भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड आणि अमरावती जिल्ह्याच्या पूर्व भागातही वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या भागांत गारपीटाचीही शक्यता आहे. असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालाची पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
Read Moreकेंद्रीय राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते पोहोचले डॉ.फुके यांच्या लाखनी निवासस्थानी, कमळ फुलवून दिला ‘हर घर कमल’चा नारा…
602 Views भंडारा/गोंदिया. केंद्रीय ग्रामविकास व पोलाद राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते यांनी गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री डॉ.परिणय फुके यांच्या लाखनी येथील निवासस्थानी भेट दिली. गोंदिया जिल्ह्यातील सड़कअर्जुनी येथे भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक संपल्यानंतर केंद्रीय मंत्री श्री कुलस्ते डॉ.परिणय फुके यांच्या लाखनी निवासस्थानी पोहोचले. डॉ.परिणय फुके यांनी केंद्रीय राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते यांचे स्वागत, अभिवादन व सत्कार करून त्यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा केली. या बैठकीत श्री.कुलस्ते यांनी भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन भाजपने सुरू केलेल्या ‘हर घर कमल‘ अभियानाची माहिती घेतली व डॉ.परिणय फुके यांच्या निवासस्थानी कमळ फुलवून…
Read Moreकोरोना संकटाच्या काळात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक व इतर नुकसानीसाठी शासनाने केली मदत जाहीर…
1,216 Views भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील ५ कोटींची मदत, सरकारचे हे पाऊल शेतकऱ्यांसाठी सर्वच दृष्टिकोनातून महत्त्वाचे -डॉ. फुके भंडारा/गोंदिया. (२२ फेब्रु.) 2020 ते 2022 या कोरोना संकटाच्या काळात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतातील पिकांचे तसेच मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्या संकटाच्या काळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची शेतजमीन, मासेमारी व्यवसाय, घरे, पिकांसह अन्य नुकसानीचा पंचनामा करून विभागीय स्तरावर शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला, मात्र नुकसानीची भरपाई त्या काळात देण्यात आली नाही. याप्रकरणी राज्याचे शेतकरी हितैषी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक पाऊल पुढे टाकत संपूर्ण राज्यातील आपत्तीग्रस्त…
Read More2024 मध्ये सुरु होईल मोदी 3.0 ची सुरुवात, 2047 मध्ये पूर्ण होणार विकसित भारताचे स्वप्न – परिणय फुके
608 Views दिल्लीतील भारत मंडपम येथे भाजपच्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत डॉ. फुके यांची उपस्थिति.. गोंदिया. 18 फेब्रुवारी दिल्लीतील प्रगती मैदानात 123 एकर परिसरात नवनिर्मित भारत मंडपम स्थळी भारतीय जनता पक्षाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहून राज्याचे माजी मंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुकेनी पक्षांचे विचार आत्मसात केले आणि मिळालेल्या सूचनांचे पालन करून देशात पुन्हा मजबूत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार स्थापन करण्याचा संकल्प करण्यात आला. ते म्हणाले, बैठकीत पंतप्रधान मोदींच्या 10 वर्षांच्या कार्यकाळातील उपलब्धी, रामलला प्राण प्रतिष्ठा, विपक्ष, भ्रष्टाचार आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीवर…
Read More