प्रतिनिधी / सालेकसा
नगर विकास आघाडी सालेकसा च्या वतीने दर रविवारी सकाळी झालं कसं तालुक्यातील जंगलात भ्रमण करण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ५.३० मिनिटांनी भात गिरणी चालत असा येथून ब्रह्मणासाठी सुरुवात होणार असून आयोजकांनी निशुल्क कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व ट्रेकर्सना सोबत जोडून सालेकसा तालुक्यातील जंगल संपदा जवळून अनुभवण्याचा आवाहन केले आहे.
यामध्ये राणी डोह, डेल्टा पॉईंट, आंबा झरण, गेंदूर झिरिया, बेवरटोला धरण, डोमाटोला व्हॅली, कचारगड दरी, बहिणी डोह, नगाराडोह, कालीसरार धरण व याशिवाय अशाच अनेक ठिकाणांचा समावेश असणार आहे.
दर रविवारी वेगवेगळ्या भागांना भेट देऊन जंगल भ्रमण होणार आहे. दैनंदिन जीवनात रोजच्या घडामोडींमध्ये मनुष्य गुंतून असतो व केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून निसर्गाला जवळ करतो, त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत असतात. यावर उपाय म्हणून या ट्रेकिंगचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सुद्धा आयोजकांनी दिली आहे.
तालुक्यातील युवक, युवती, पुरुष आणि महिला मंडळ यामध्ये समाविष्ट होऊ शकतात व यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून केवळ सकाळी ५.३० मिनिटांनी भात गिरणी सालेकसा येथे पोहोचणाऱ्या सर्व ट्रेकर्सना भटकंतीवर घेऊन जाणार असणार आहे. या माध्यमातून सालेकसा परिसरात असलेल्या विविध ठिकाणांना चालना मिळून पर्यटन विकास व्हावा अशा उद्देश असल्याचे सुद्धा आयोजकांकडून बोलले जात आहे.