गोंदिया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री शरदचंद्रजी पवार साहेब, खासदार श्री प्रफुल पटेलजी, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटीलजी यांच्या संकल्पनेतून एक तास राष्ट्रवादी साठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून कार्यक्रम राबविण्यात येत आहे. पक्षाच्या प्रभावी – प्रगल्भ पुरोगामी विचारांची वैचारिक शिदोरी महाराष्ट्राच्या तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, या विचारधारेने प्रत्येक कार्यकर्ता प्रेरीत झाला पाहिजे. म्हणून एक तास राष्ट्रवादीसाठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी हा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे असे प्रतिपादन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी केले.
राष्ट्रीय चौक, ग्राम कुडवा ता. गोंदिया येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक तास राष्ट्रवादी साठी कार्यक्रम माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
माजी आमदार श्री राजेंद्र जैन पुढे म्हणाले कि, पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एक तास राष्ट्रवादी साठी म्हणजेच जनतेच्या सेवेसाठी द्यायचा असून या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार जनतेच्या अडीअडचणी व प्रश्न जाणून घेता येतील. खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांना जनतेपर्यंत पोहचवून पक्ष बळकटी साठी जास्तीत जास्त सभासद नोंदणी पक्ष पदाधिकाऱ्यांनी करावे
याप्रसंगी सर्वश्री राजेंद्र जैन, बाळकृष्ण पटले, रमेश गौतम, पन्नालाल डहारे, शैलेश वासनिक, महेश तांडेकर, संतोष लिल्हारे, संजय उके, बालचंद टेम्भारे, संतोष बोपचे, पवन पटले, आशिष डहारे, राजू बावणथळे, सुनील मेश्राम, मीन्नू शेंडे, संजू देशमुख, सत्यजित उके, लक्ष्मीचंद कटरे, कमल पारधी, भोजराज तुरकर, प्रितकुमार लटाये, सुरेश ढबाले, कांतीकुमार पतेह, बुद्धरत्न बागडे, किशोर फरडे, सुमेध जगणित, शोभेलाल मेश्राम, दामाजी बांडेबुचे, कीर्तिताई पटले, अल्का शेंडे, सुंदरीताई तांडेकर, दीपाताई चौधरी, निर्मलाताई अगडे, पायलताई बागडे, महेश वैद्य, जयंद्र पटले, दुर्गाबहादूर परिहार, आकाश परिहार, नूतन पटले, युगेंद्रनाथ बिसेन, रज्जुबाबा बिसेन, मोहंन बोपचे, केशारीचंद बिसेन, संतोष ठाकरे, जितेंद्र पटले, शामबाबा घोडीवाले, नरेश बघेले, प्रीतम हरिणखेडे, पुरुषोत्तम बिसेन, सोनू पटले, आशिष बावनथडे, रुपचंद बोपचे, गौरव पटले, पप्पू बिंझाडे, सोमेश उपवंशी, तुषार गडेवार सहित पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.