दहा वर्षानंतर भाजपकड़े असलेली नागपूरची जागा महाविकास आघाडीने जिंकली, सुधाकर आडबाले विजयी..

496 Views

नागपुर: नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा धक्कादायक निकाल समोर आला आहे. महाविकास आघाडी पुरस्कृत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर आडबाले यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार नागोराव गाणार याचा पराभव केला आहे. सुधाकर आडबाले यांचा 16 हजार 500 मतांनी विजयी झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

 
विशेष म्हणजे, हा जागा दहा वर्षापासून भाजपकडे होती. या मतदारसंघात दोन वेळा नागो गाणार आमदार होते आणि तिसऱ्यांदा निवडणूक मैदानावर हैट्रिक साठी लढत होते। परंतु भाजपकड़े असलेली नागपूरची जागा महाविकास आघाडीने जिंकली.

नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये २२ उमेदवार रिंगणार होते. येथे सरासरी ८७.२६ टक्के मतदान झाले होते. भाजप समर्थित उमेदवार नागो गाणार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले यांच्याच प्रमुख लढत होती. पहिल्या फेरीच्या मतमोजणीत अडबाले यांना १४०७१ तर गाणार यांना ६३०९ मते मिळाली. एकूण ७ हजाराहून अधिक मतांनी अडबाले आघाडीवर होते.

अडबाले यांनी पहिल्या फेरीत मतांचा कोटा पूर्ण करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. महत्वाचे म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या होम ग्राउंडवरच महाविकास आघाडीने विजय मिळवल्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Related posts