पक्ष संघटन मजबुती करिता एक तास राष्ट्रवादीसाठी हा उपक्रमाला यशस्वी करा- मा. आमदार राजेन्द्र जैन

362 Views

 

गोंदिया तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक माजी आमदार राजेन्द्र जैन यांच्या उपस्थितीत संपन्न

गोंदिया। गोंदिया तालुक्यातील नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत च्या निवडणूकीत पक्षाला निश्चीतच यश प्राप्त झालेला आहे पण काही चुका सुद्धा झाल्यात त्या चुकांचा बोध घेवून त्यावर वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विचारमंथन करण्याची गरज आहे. आगामी काळात पक्ष संघटनेला मजबुती प्रदान करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागणार आहे. पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समन्वय साधून पक्षाचे काम केल्यास यश प्राप्त करण्यात कोणतीही अडचण येणार नाही याची खात्री आहे असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.

आज राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली कार्यालय, गोंदिया येथे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक माजी आमदार राजेन्द्र जैन, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

राजेंद्र जैन पुढे म्हणाले कि, आगामी काळात होत असलेल्या निवडणूकीदृष्टीने कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे. आगामी काळात जनतेच्या प्रश्नांना घेऊन संघर्ष करावा लागेल. लोकांच्या संपर्कात राहून पक्ष वाढीकरिता सर्व मिळून कार्य केल्यास यश नक्कीच मिळेल. पक्ष संघटन मजबुती करिता व जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व खा. प्रफुल पटेल यांच्या सूचनेनुसार एक तास राष्ट्रवादीसाठी हा उपक्रम राबविण्यात यावा तसेच जास्तीत जास्त युवा व महिलांना पक्षाशी जोडण्याचे कार्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करावे.

यावेळी राजेंद्र जैन, गंगाधर परशुरामकर, बालकृष्ण पटले, पूजा अखिलेश सेठ, केतन तुरकर, नीरज उपवंशी, अखिलेश सेठ, शंकरलाल टेंभरे, राजू एन जैन, चंदन गजभिये, रजनी गौतम, रवी पटले, नितिन टेंभरे, पंकज चौधरी, रमेश गौतम, ललिता पुंढे, सोनम मेश्राम, दीक्षा, अनिता बिजेवार, धरम रहांगडाले, आत्माराम पटले, राजेश रामटेके, सुरेश भीमटे, लष्मीकांत चिखलोंडे, चैनलाल दमाहे, सुरेश कावड़े, सहेशराम उपवंशी, सुनील पटले, शैलेश वासनिक, प्रकाश बरैया, राधेलाल पटले,राजेश भीमटे, सुरेश श्रीभद्रे, टी एम पटले, रमेश कुरील, गोविंद लीचढे, विजय राहंगडाले, विजय ठाकुर, देवलाल टेंभरे, कपिल बावनथडे, शेखर पटले, जागेश उके, माणिक पारधी, करण टेकाम, तिलक भंडारकर, बिज्जू कंसरे, हरगोविंद चौरसिया, नागरत्न बंसोड़, लव माटे, कान्हया पंधरे, गोविंद वासनिक, आरिफ पठान, राजेश तायवाडे, महेश चौधरी, भागेश बिजेवार, मुकेश पटले, पिंटू बनकर, राजेश राहंगडाले, दिलीप डोंगरे, गोविंद ठाकुर,धर्मराज कटरे, दुलीचंद चौरिवार, योगेश पतेह, जितेंद्र बिसेन, आरजू मेश्राम, दुलीराम भाकरे, तिलकचंद पटले, श्रीराम निखाड़े, राजू गायधने, महेश तांडेकर, संजय शेंडे, रमेश हरिनखेड़े, ताराचंद मेंढे, प्रकाश नेवारे, महेश साठवाने, संतोष बिसेन, मिलिंद रामटेके, उर्मिला प्रधान, नामदेव काटे, पदमलाल चौरिवार, प्रमोद कोसरकर, कान्हा बघेले, योगी ऐड़े, कुणाल बावनथड़े, रौनक ठाकुर, नरेंद्र बेलगे, वामन गेडाम सहित पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Related posts