चक्रवर्ती सम्राट राजाभोज जंयती: शहरात महारॅली काढून समाजबांधवानी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला..

394 Views

रॅलीमध्ये पारंपारीक वाजंत्रीसह खाचर आणि बैलबंडी हे आकर्षणाचे केंद्र ठरले..

गोंदिया : पोवार समाजाचे आराध्य दैवत चक्रवर्ती सम्राट राजाभोज यांची जयंती वसंत पंचमी पर्वावर साजरी करण्यात येते. यंदाही वसंत पंचमीच्या पर्वावर शहरात पवार प्रगतीशील मंच गोंदिया,  फुलचूर, छोटा गोंदिया, मुर्री, कुडवा, सूर्याटोला आदी गावात राजाभोज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून आज ४ फेब्रुवारीला गोंदिया शहरात भव्य महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते.फूलचूर व मुर्री येथून आलेल्या रॅलींचे स्वागत जयस्तंभ चौकात करण्यात आले.त्यानंतर या दोन्ही रॅली व पवार प्रगतीशील मंच गोंदियाची रॅली एकत्र येत शहर भ्रमंती करीत महारॅलीचा समारोप नेहरु चौकात करण्यात आले.
या रॅलीमध्ये समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रॅलीमध्ये पारंपारीक वाजंत्रीसह खाचर आणि बैलबंडी हे आकर्षणाचे केंद्र ठरले होते.जयस्तंभ चौक,गांधीप्रतीमा ,चादंणी चौक,गोरेलाल चौक मार्गक्रमण करीत रॅली नेहरु चौकात पोचली. त्याठिकाणाहून फूलचूर येथील रॅली फुलचूरकडे व मुर्री येथील रॅली मुर्रीकडे रवाना करण्यात आले.
गोंदियात निघालेल्या चक्रवर्ती सम्राट राजाभोज जंयती महोत्सवानिमित्त महारॅलीत समाजबांधवानी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.या रॅलीत जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहागंडाले,जिल्हा परिषदेचे सभापती संजयसिंह टेंभरे,गोंदिया पंचायत समितीचे सभापती मुनेश रहागंडाले,माजी आमदार हेमंत पटले,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेतराम कटरे,राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेचे संगठन सचिव खेमेंद्र कटरे,पवार प्रगतीशिल मंचचे अध्यक्ष एड.पी.सी.चव्हाण,एड.टी.बी.कटरे,प्रगतीशिल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश भक्तवर्ती,जितेश राणे,जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष राधेलाल पटले,माजी जि.प.सभापती रमेश अंबुले,डाॅ.प्रशांत कटरे राजेश चव्हाण,राजेश राणे, संजय रहागंडाले,पं.स.सदस्य स्नेह गौतम, महिला अध्यक्ष ईशा गौतम, फुलचूर राजाभोज उत्सव समितीचे अध्यक्ष पप्पू पटले, जय पटले, मनोज रहागंडाले, गोवर्धन बघेले, गुणराज ठाकरे, सुभाणराव रहागंडाले, राजेश अंबुले, मोनु पारधी, दुर्गाप्रसाद बिसेन, माजी नगरसेवक अशोक(गप्पू)गुप्ता, राजीव ठकरेले, निलम हलमारे, बी.डब्लू.कटरे, अनिल टेंभरे, शिशिर कटरे, महेंद्र बिसेन, भागचंद रहागंडाले, प्रा.संजीव रहांगडाले, किशोर भगत, प्रीती देशमुख, सुरेश पटले, पकंज पटले, हेमंत बघेले, युगराज रहागंडाले, बंटी बोपचे, अनिल रहागंडाले, अजित टेंभरे, मुर्री येथील समितीचे अध्यक्ष पंकज टेंभरे, सचिव संदिप शरणागत, उपाध्यक्ष मनोज रिनायत,सदस्य मुकेश रिनायत, आशिष कटरे, योगेश शरणागत, अशोक हरिणखेडे, भुवन रिनायत, उमेश पारधी, ओमप्रकाश पारधी, तिर्थराज रहागंडाले, भाष्कर रहागंडाले, विक्की बघेले, ओ.जे.बिसेन, शंकर पारधी, खुशाल कटरे, डाॅ.पारधी, छत्रपाल तुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
रॅलीतील सहभागी समाजबांधवाकरीता गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटी, आमदार विनोद अग्रवाल यांची जनता पार्टी, जितेश राणे मित्र परिवारसह पवार प्रगतीशिल मंच  व बंजरंग दलाने नास्ता व पाण्याची सोय केली होती.

Related posts