भंडारा येथे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न
प्रतिनिधि। 28 नवंबर
भंडारा। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय भंडारा येथे माजी आमदार श्री राजेंद्र जैन, श्री नाना पंचबुद्धे, श्री धनंजय दलाल यांच्या उपस्थितीत भंडारा तालुका कार्यकर्ता आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर पंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी भंडारा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवाराचे नांव नोंदविण्यात आले.
खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एक चा पक्ष बनविण्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम केले पाहिजे. तालुक्यातील प्रत्येक क्षेत्रात सक्षम उमेदवार उभे करणार असून विकास हाच राष्ट्रवादी काँग्रेस चा मुद्दा असेल असे संबोधनात श्री जैन म्हणाले.
खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नाने शेतकर्यांच्या आर्थिक अडचणी समजून घेत सलग दोन वर्षे धानाला बोनस देण्यात आला. धानाच्या विक्री ला अडचण येऊ नये म्हणून खरेदी केंद्र वाढविण्यात आले, त्यात पुन्हा भर करीत तालुक्यातील कोणत्याही आधारभुत खरेदी केंद्रावर शेतकर्यांना धानाची विक्री करता येणार आहे. शेतकर्यांच्या व जनतेच्या हिताचे अनेक निर्णय श्री पटेल यांनी घेतले.
या बैठकीला माजी आमदार श्री राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष श्री नाना पंचबुद्धे, प्रदेश महासचिव श्री धनंजय दलाल, श्री रामलाल चौधरी, भंडारा तालुकाध्यक्ष श्री नरेंद्र झंझाड, श्री सुमेध श्यामकुवर, श्री यशवंत सोनकुसरे, ऍड. नेहा शेंडे, सोबत सर्वश्री नरेश धुर्वे, आरुजू मेश्राम, दयानंद नखाते, प्रभू फेंडर, ईश्वर कळंबे, सुभाष वाघमारे, हितेश सेलोकर, राजेश मेश्राम, महेश जगनाडे, डॉ यशवंत मडामे, सुनील टेबुरने , उत्तम कळपाते, वामन शेंडे, महेश निंबारते, रुपेश खवास, संजय लांजेवार, सौ. सविता नागदेवे, सौ. कीर्ती गणवीर, नितेश खेत्रे, भोलानाथ वैरागडे, मधुकर भोपे, चोलाराम गायधने, सुकराम अतकरी, नितीन खाटीक, देवा हटवार, सौ. निरुताई पेंदाम, नाणेश्वर भुरे, रवी पुडके, नरेश येवले, पकेश काळे,नरेश हटवार, संजय काटकवार, विलास खंडाळे, सौ. पुण्यशिळा कांबळे, सौ. आरती मेश्राम, सौ. करिश्मा लांजेवार, सौ. प्रतिमा खेत्रे, सौ. ज्योती टेभुर्णे, सौ. मनीषा वाघमारे, नरेश कुंभलकर, हिरामण साठवणे, सुखराम अतकरी, प्रवीण मडामे, रुपचंद नागपुरे, राजकुमार उताणे, भास्कर बोरकर, मदन भुरले, श्रीकांत गभणे, संजय लांजेवार, राजेश डोरले, राजकुमार भुरे, निकेश मेश्राम, वैशिष्ट गाडवे, श्यामराव उईके, डॉ यशवंत मडावी, अंकुश मेश्राम, शिवशंकर शहारे, संघदीप डोंगरे, उत्तम खोब्रागडे, प्रदीप देवगडे, राहुल बहेकार, राजकुमार खोब्रागडे, उमेश टिपले, राजेश मेश्राम, कुंदन बोदरे, भगवान शेंडे, सुरेश बडगे, प्रभाकर बोदेले, विनोद बनसोड, चेतन बोदरे, सुभाष तितिरमारे, रामेश्वर राघोर्ते, डॉ विश्वजित, प्रभू फेंडर, डॉ युवराज गोंडाणे, रजनीश बन्सोड, मोरेश्वर मारवाडे, विलास मारवाडे, विनोद ठवरे, काशीराम पवनकर, समीर मोहरकर, जंनक मोरघडे, भगवान बुराडे, मंगेश धोटे, विनोद शाठवणे, अज्ञान राघोर्ते, पंढरी राऊत, प्रवीण वाघमारे, दिनेश मोहतुरे, पंकज मडामे, प्रतीक मेश्राम, खुशाल बोरकर, सौरभ मारवाडे, आदित्य लांडगे, रतन तिरपुडे, प्रमोद बोरकर व फार मोठ्या संख्येने कार्यकर्ता उपस्थित होते.