जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत मध्ये खा. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात क्षेत्राचा विकास हाच राष्ट्रवादी काँग्रेसचा मुद्दा

316 Views

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर तसेच अजय लांजेवार व रिताताई लांजेवार यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधि। 27 नवंबर

सड़क अर्जुनी। आज काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा व सत्कार कार्यक्रम एरिया 51 कोहमारा तालुका सडक/अर्जुनी येथे माजी आमदार श्री राजेंद्रजी जैन, आमदार श्री मनोहर चंद्रीकापुरे व जिल्हाध्यक्ष श्री गंगाधर परशुरामकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सत्कार मुर्ती श्री गंगाधर परशुरामकर, श्री अजय लांजेवार व श्रीमती रिताताई लांजेवार यांचा शाल व श्रीफळ देऊन सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी संबोधित करतांना माजी आमदार राजेंद्र जैन म्हणाले की, खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात जिल्ह्याच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेनी साथ द्यावी श्री पटेलजी यांच्या प्रयत्नांने शेतकरी, शेतमजूर यांच्या हिताचे कार्य करीत शेतकर्‍यांच्या धानाला सलग दोन वर्षे बोनस देण्याचा काम केले आहे, शेतकरी वर्गाची पिळवणूक होवू नये म्हणून दोन्ही जिल्हात धान खरेदी केंद्र वाढविण्यात आले. धापेवाडा, रजेगाव, चुलबंध मध्यम प्रकल्प या सारख्या अनेक प्रकल्पाचा मध्यमातुन जलसिंचनाच्या सोयी, कोवीड संक्रमण काळात आँक्सीजन चा पुरवठा करणे, रेमडेशिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देणे व अत्यावश्यक औषधांचा साठा उपलब्ध करून देण्याचे काम श्री पटेल यांनी केले. ज्या प्रतिनीधींना जनतेनी जबाबदारी दिली ते लोक कधीच संक्रमण काळात दिसले नाही. आता त्यांना जागा दाखवायची वेळ आली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत च्या निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर झाला असून प्रत्येक कार्यकर्त्याने जिद्दीने कामाला लागले पाहिजे.

श्री मनोहर चंद्रीकापुरे म्हणाले की, निवडणुकीत नियोजनाबद्ध पद्धतीने कार्य सक्रिय लोकांना प्रत्येक बुथ ची जिम्मेदारी दिली पाहिजे. जिल्ह्याचा विकास सध्या करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी प्रत्येकाने घेतली तर यश नक्की आपलाच आहे.

या कार्यक्रमाला माजी आमदार राजेन्द्र जैन, आमदार मनोहर चंद्रीकापुरे, राकापा जिलाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, सुनील फुंडे, अविनाश काशिवार, अजय लांजेवार, श्रीमती रिता लांजेवार, श्रीमती छायाताई चौहान सोबत श्रीमती रजनीताई गिरेपुंजे, डी यु राहंगडाले, देवचंद तरोने, गजाजन परशुरामकर, श्रीमती मंजुताई डोंगरवार, किशोर तरोने, मिलन राऊत, दिनेश कोरे, नामदेव डोंगरवार, रमेश चुरहे, बंडूभाऊ भेंडारकार,श्रीमती वंदनाताई डोंगरवार, सचिन लोहिया, श्रीमती अनिता बांबोर्डे, प्रियंक उजवने, एफ आर टी शाह, अतुल फुले, कृष्णा ठलाल, श्रीमती वंदना थोटे, श्रीमती वंदना डोये, श्रीमती अंजली जांभुळकर, श्रीमती इंदुताई परशुरामकर,श्रीमती शशिकला टेंभुर्णीकर, दिलीप गभने, ईश्वर कोरे, शिवाजी गाहाणे, उज्वल चौधरी, अविनाश भिमटे, नरेंद्र भेंडारकर, मुन्ना देशपांडे, हेमराज खोटोळे, सचिन येशमसुरे,श्रीमती रेखा कोसरकार, उमराव मांडरे, प्रमोद लांजेवार, आनंद इडपाते, आर. बी. वाडई, सुरेश झोडे, श्रीमती प्रतिमा कोरे, श्यामराव वासनिक, मतीन शेख, फारुख शेख, भागवत झिंगरे, श्रीमती संध्या श्रीरंगे, अमीन शेख, कमलेश वालदे, नाजूक झीगरे, डेविड सयाम, संदीप सयाम, नूतन अग्रवाल, मोहन शर्मा, सुभाष कापगते, श्रीमती भाग्यश्री सलामे, श्रीमती संगीता ब्राह्मणकर, नीरज पुंडलिक, रुपेश शर्मा, प्रशांत बालसनवार, ज्ञानिराम कापगते, श्रीमती जयाताई मसराम, श्रीमती चंदाताई मेघराज, राहुल यावलकर व अन्य पदाधिकारी, कार्यकर्ता उपस्थित होते.

Related posts