गोरेगांव पंचायत समिती आवारातील वाचनालयाला दिले चार पंखे, माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी घेतली दखल

933 Views

 

गोरेगाव। शहरातील पंचायत समिती च्या आवारात समाज कल्याण विभागाच्या वतीने सार्वजनिक वाचनालयाचे बांधकाम करण्यात आले. मात्र या वाचनालयात सोईसुविधा पुरविल्या गेल्या नाही. त्यादिशेने सहा दिवसापूर्वी गोरेगाव तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहागङाले तालुक्याच्या दौरावर असतांना वाचनालयात सोईसुविधा हव्या यासाठी काही विद्यार्थ्यांनी आमदार विजय रहागङाले यांना निवेदन देण्यात आले होते. तेव्हा आमदार राहागङाले यांनी शासकीय मदत लवकर मिळणार नाही. असे सांगत गोरेगाव नगर पंचायत चे माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार यांना मदत करण्याचे निर्देश दिले होते. बारेवार यांनी आज दि. 23 आॅक्टो रोजी शनिवारी वाचनालयाला स्वखर्चाने चार पंखे देत सामाजिक कार्यात हातभार लावला आहे.

शहरात विद्यार्थ्यांना बसून अभ्यास करण्यासाठी मोठी वाचनालय नाही. पुस्तके नाही. प्रशासनिक सेवेत जाण्यासाठी अनेक विद्यार्थी सोईसुविधेअभावी मागे पडतात. अशावेळी स्थानिक लोकप्रतिनिधीची मदत ही मिळत नाही. या सर्व बाबी हेरून पंचायत समिती च्या आवारात वाचनालय उघडण्यात आली पण या वाचनालयात सोईसुविधा नाहीत. आमदार विजय रहागङाले यांना या संदर्भात निवेदनाच्या माध्यमातून माहीती देण्यात आली. त्यांनी लवकरच सोईसुविधा देण्याचे आश्वासन दिले आहे.

तत्पूर्वी माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून युवा शक्ती स्पोर्टस् क्लब च्या वतीने वाचनालयाला चार पंखे दिले. यावेळी माजी समाजकल्यान सभापती विश्वजीत डोंगरे नगर पंचायत चे माजी बांधकाम सभापती रेवेद्रकुमार बिसेन, सामाजिक कार्यकर्ते विकास बारेवार प्रामूख्याने उपस्थित होते.

Related posts