धान खरेदीवरुन पालकमंत्री अनिल देशमुखांनी केली अधिकाऱ्यांची कान उघडणी….खरेदीला उशीर का झाला याचा विचारला जाब

286 Views

सर्व केंद्रावर 25 नोव्हेंबर पर्यंत धान खरेदी सुरू करण्याचे आदेश

प्रतिनिधि।

गोंदिया। जिल्हात धान खरेदी करण्यासाठी होत असलेल्या उशीरामुळे पालकमंत्री अनिल देशमुख यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. दिवाळी संपली तरी अदयापही धान खरेदी सुरु का करण्यात आली नाही याचा जाब यावेळी अनिल देशमुख यांनी यावेळी विचारला. २५ नोव्हेबर पर्यत सर्व धान खरेदी केंद्र सुरु करा. तसेच २८ नोव्हेंबरला मी आणि खा. प्रफुल्ल पटेल यांच्या सोबत गोंदिया येथे येवून किती खरेदी झाली याचा आढावा घेण्यास असल्याचे सुध्दा अधिकाऱ्यांना सांगीतले.
जिल्ह्यातील धान खरेदीचा आढावा ऑनलाईन बैठकीत घेण्यात आला त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. जिल्हाधिकारी दिपककुमार मीना, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराम वानखेडे, जिल्हा पणन अधिकारी भारत भूषण पाटील, प्रादेशिक व्यवस्थापक अविनाश राठोड, अतुल नेरकर यावेळी उपस्थित होते.
28 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी यांनी पणन अधिकारी यांचे कार्यक्षेत्रात 70 धान खरेदी केंद्रांना व आदिवासी विकास महामंडळाच्या क्षेत्रात 44 धान खरेदी केंद्रांना मंजुरी दिली असतांना 22 नोव्हेंबर पर्यंत पणन अधिकाऱ्यांनी 41 केंद्रावर 21 हजार क्विंटल तर आदिवासी विकास महामंडळाने 3 केंद्रावर 2 हजार क्विंटल धान खरेदी केले. यामुळे शेतकऱ्यांचे धान खरेदी विना पडून असून त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे, अशा शब्दात पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. 25 नोव्हेंबर पर्यंत सर्व केंद्रावर शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी सुरू करावी असे निर्देश त्यांनी पणन अधिकाऱ्याला दिले. त्याचप्रमाणे नवीन केंद्रास मंजुरी द्यावयाची झाल्यास तसे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

Related posts