पवनी: गावाचा विकास हेच माझे ध्येय – डॉ.परिणय फुके

435 Views

पवनीतील अनेक गावात विकास कामांचे भूमिपूजन संपन्न..

पवनी/भंडारा.
गावातील मंदिरे, बौद्ध विहार, ग्रामपंचायत संकुल व रस्त्यालगतचे परिसर आकर्षक व सुंदर बनविण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अनेक गावांमध्ये  पेव्हिंग ब्लॉक व विविध विकास कामांचे भूमिपूजन आज १० जानेवारी रोजी माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांचे हस्ते संपन्न झाले.

या कामांच्या भूमिपूजनप्रसंगी श्री.फुके म्हणाले की,  गावातील मंदिर, बौद्ध विहार संकुलासह गावाचे सुशोभीकरण केल्यास एक उत्साहाचे वातावरण निर्माण होईल व  गावात स्वच्छता व आकर्षकता निर्माण होईल.

परिणय फुके म्हणाले, या धार्मिक अनुष्ठाना सोबतच संपूर्ण गावाचा विकास करण्याचा माझे प्रयत्न आहे. रस्ते पक्के झाले पाहिजेत, पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये आणि गावातील प्रत्येक माणसाला मुलभूत सुविधा मिळाव्यात. प्रत्येक व्यक्तीला सरकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी शेवटच्या घटकापर्यंत जायला पाहिजे.

या ठिकाणी झाले विकास कामांचे भूमिपूजन..

माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्या हस्ते, पवनी तालुक्याच्या सिरसाळा गावात असलेल्या हनुमान मंदिराच्या प्रांगणात पेविंग ब्लॉक भूमीपूजन, शिवनाळा गावातील हनुमान मंदिर परिसरातील पेव्हर ब्लॉकचे भूमिपूजन, वलनी गावातील बौद्ध विहाराचे सुशोभीकरण, भूमिपूजन, मांगली गावातील श्री विठ्ठल रुक्मिणी व हनुमान मंदिरात पेव्हिंग ब्लॉक भूमीपूजन, उमरी ग्रामपंचायत आवारात पेव्हर ब्लॉक भूमिपूजन, बोरगाव येथील ग्रामपंचायत आवारात पेव्हर ब्लॉक भूमिपूजन, ब्राह्मी गावात असलेल्या अंगणवाडी संकुलात पेव्हर ब्लॉक भूमिपूजन, सेंद्री गावचे जिप शाळेपासून बौद्ध विहारापर्यंत पेव्हर ब्लॉक भूमिपूजन, ब्राह्मणी गावात श्री रमेश गिर्‍हेपुंजे ते श्री भोजराज मेंगरे यांच्या घरापर्यंत पेव्हर ब्लॉकचे भूमिपूजन, लोनारा येथील जिल्हा परिषद ते मेनरोड चौकापर्यंत पेव्हर ब्लॉक भूमिपूजन, पालोरा गावातील शिवमंदिर संकुलातील सभामंडपासमोर पेव्हर ब्लॉकचे भूमिपूजन करण्यात आले.

यांची होती उपस्थिति…

यावेळी सिरसाळ सरपंच सौ प्रीती ताई मेश्राम, शिवनाळा सरपंच श्री सुभाष खांदाळे जी, उपसरपंच श्री विलास तिघरे जी, उपसरपंच श्री द्रोणाचार्य बावनकर जी, श्री उमेश तिघरे जी, श्री मिलिंद राऊत जी, सौ वर्षाताई वैद्य, सौ निर्मला ताई पाटील, तिलक वैद्य जी, श्री मोहन सुरकर जी, श्री राजेंद्र फुलबांधे जी, श्री खेमराज देशमुख जी, श्री संदीप सेलोकर जी, श्री पंकज देशमुख जी, श्री मनोहर आकरे जी, श्री अभिषेक रत्न पारखी जी, डॉ राजेश नंदुरकर जी, श्री सोनू कोरेकर जी, वलनी सरपंच सौ वच्छलाताई तिघरे, उपसरपंच श्री सचिन तिघरे जी, चंद्रगुप्ता मेंढे, पुरुषोत्तम सेलोकर, विठ्ठल जिभकाटे, खेमराज तिघरे, रामचंद मरघडे, जगदीश वैद्य, राकेश मांडवकर, गोपाल वैद्य, सरपंच श्री गौतम कोरे जी, सरपंच श्री शिशुपाल रामटेके जी, सरपंच सौ निलिमा ताई मेश्राम , उपसरपंच श्री मनोज बागडे जी,  उपसरपंच श्री विलास धावडे जी, उपसरपंच श्री प्रवीण खोपे जी, श्री रोशन माथूरकर जी, श्री योगेश कोरे जी, सौ ममता ताई कोरे, श्री राम पवार जी, श्री बाळकृष्ण धावडे जी, श्री संग्राम धावडे जी, श्री बाळकृष्ण वैरागडे जी, श्री विनायक राव फुंडे, श्री संजय काळे जी, श्री देवानंद खोपे जी, श्री तोमेश्र्वर पंचभाई जी, श्री धनराज जिभकाटे जी उपस्थित होते.

Related posts