प्रतिनिधि। 31 ऑगस्ट
गोंदिया। केंद्र शासनाच्या मतिमंद मुलांकरीता काम करणाऱ्या राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांग सशक्तीकरण केंद्र, नवी मुंबई यांच्या कडून आज 31 ऑगस्ट ला दिव्यांग समावेशक केंद्र, कुडवा, तालुका गोंदिया येथील अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मतिमंद मुलांना शैक्षणीक किट चे वाटप करण्यात येणार आहे.
एका किट ची किंमत रु.10,000/- असुन जिल्हयाला एकूण 82 किट मोफत प्राप्त झाल्या आहेत.
सदर किट वाटप हे उपरोक्त संस्थेचे कार्यालय प्रभारी मा. श्री ज्ञानेश्वर सावंत, नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनात होणार आहे.
शिबिराची सुरुवात मा. श्री पंकजभाऊ रहांगडाले, अध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिया यांच्या प्रमुख उपस्थितीत मा. श्री अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. श्री यशवंत गणवीर, उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण समिती व मा. डॉ.श्री महेंद्र गजभिये, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या उपस्थतीत होणार आहे.
यात आमगाव येथील 1, अर्जुनी/मोरगांव 7, देवरी 5, गोंदिया 22, गोरेगांव 13, सडक/अर्जुनी 16 सालेकसा 10 व तिरोडा 8 असे एकूण 82 लाभार्थी आपल्या पालकांसोबत येणार असल्याची माहिती विभागांचे जिल्हा समन्वयक विजय ठोकणे यांनी दिली आहे.
Plz publish.