आदर्श सार्वजनिक वाचनालय येथे डॉ एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा

475 Views

 

गोरेगाव – १२/८
तालुक्यातील मोहाडी येतील अ दर्जा प्राप्त ग्रंथालय आदर्श सार्वजनिक वाचनालय येथे आज दिनांक १२ ऑगस्ट रोजी ग्रंथालय शास्त्रांचे जनक डॉ शियाली रामामूत रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहाडी ग्रांम पंचायत चे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे तर प्रमुख अतिथी संस्थेचे अध्यक्ष मदनलाल बघेले, संस्थेचे संस्थापक सचिव वाय डी चौरागडे, सदस्य जागेश्वर पटले,वाय एफ पटले सर,हिरालाल महाजन, तंन्टामुक्ती गांव समिती अध्यक्ष लिखीराम बघेले, प्रमानंद तिरेले,देवदास चेचाने, बी बी बहेकार, चुळामन पटले, कमलेश पारधी, शिवराम मोहनकार, मुकेश येरखडे,आशा चेचाने आदी मान्यवर गांवकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी सांगितले की समाजनिर्मितीसाठी शालेय शिक्षण सोबत निरंतर शिक्षण देखील किती आवश्यक असते याचे महत्त्व डॉ एस आर रंगनाथन यांनी सर्व प्रथम पटवुण दिले होते ग्रंथालय ही एक सामाजिक संस्था असून समाजाच्या हितासाठी ग्रंथालयाचे संवर्धन करणे आवश्यक आहे.

सामाजिक विकासासाठी ग्रंथ आणि ग्रंथालयाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे विद्यार्थीना जीव लावणारे शब्द आयुष्य घडवतात तर जिव्हारी लागणारे शब्द विद्यार्थ्यांचे आयुष्य बिघडवतात शब्द हे प्रेम आहे यासाठी प्रत्येकानी ग्रंथाचे वाचन करावे असे मान्यवरांनी सांगितले
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सुभाष चौरागडे यांनी केले

Related posts