४ वर्षामध्ये आ. विनोद अग्रवाल यांनी क्षेत्राच्या विकासासाठी मोठ्याप्रमाणात निधी खेचून आणली – सभापती मुनेश रहांगडाले

605 Views

 

आ.विनोद अग्रवाल यांच्या स्थानिक निधीतुन मंजूर सभामंडपाचे सभापती मुनेश रहांगडाले यांच्या हस्ते भुमिपुजन संपन्न

प्रतिनिधी/गोंदिया

गोंदिया विधानसभा क्षेत्रातील तुमखेडा खुर्द येथे आ.विनोद अग्रवाल यांच्या स्थानिक निधीतुन मंजूर असलेले स्मशानभूमी मध्ये १०.०० लक्ष इतक्या निधीचे सभामंडपाचे भूमिपूजन पंचायत समिती चे सभापती मुनेश रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले.

या निमित्याने सभापती मुनेश रहांगडाले यांनी थोडक्यात आमदार विनोद अग्रवाल यांच्या बद्दल उपस्थितीतांना संबोधित केले की गेल्या ४ वर्षामध्ये आमदार साहेबांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे. व त्या निधीतुन असे अनेक उल्लेखनीय कार्य आहेत.

कोरोना सारख्या उद्भवलेल्या परिस्थिती मध्ये त्यानी अविरत कार्य करून जनतेचे समस्या सोडविण्याचे कार्य केले आहे. व आम्हाला ख-या अर्थ्याने जाणीव आहे एक खरा जनतेचा सेवक आम्हाला लाभेलेला आहे. व त्यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे. तसेच त्यांच्या कामाची वाहवाही सुद्धा सभापती मुनेश रहांगडाले यांनी या दरम्यान केली.

या निमित्याने प्रामुख्याने मुनेश रहांगडाले सभापती पंचायत समिती गोंदिया,आशीष हत्तीमारे सरपंच तुमखेडा खुर्द, शेखर वाढवे माजी पंचायत समिती सदस्य, लक्ष्मन मंडीये उपसरपंच,निलेश्वर कोरे अध्यक्ष सेवा सहकारी संस्था, सुरेश मचाडे माजी ग्रामपंचायत सदस्य तुमखेडां, प्रल्हाद बनोटे माजी उपसरपंच ग्रामपंचायत तुमखेडां खुर्द , योगेश मचाडे , सोमनाथ कोरे ,धर्मेश नागपुरे, दुर्गेश लिल्हारे ,धनराज रनगीरे,विजय देशकर, दिनेश लाडे व इत्यादी कार्यकर्त्ता तसेच गावातील नागरिकगण उपस्थित होते.

Related posts