गोंदिया: अमृत भारत योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधानांचे आभार- खा. प्रफुल्ल पटेल

775 Views

 

भंडारा व तुमसर रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यासाठी खा. पटेलांचा पाठपुरावा

6 आगस्ट।

गोंदिया। अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेच्या माध्यमातून राज्यातील अनेक रेल्वे स्थानकांचे कायापालट होणार आहे. यात गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, आमगाव या रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला. त्याबद्दल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी सह रेलवे मंत्रालयाचे आभार. या योजनेच्या प्रस्तावित टप्प्यात तुमसर व भंडारा या रेल्वे स्थानकांचाही समावेश करण्यात यावे, या निवेदनासह खा. प्रफुल पटेल यांनी आभार मानले.

आज (ता.६) अमृत भारत योजने अतंर्गत समाविष्ट असलेल्या रेलवे स्थानकाच्या विकास कामांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले.

या योजनेत गोंदिया व आमगाव या रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला. त्याबद्दल खा. प्रफुल पटेल यांनी गोंदिया व भंडारा जिल्हावासियांच्या वतीने पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्रालयाचे आभार मानले. या प्रसंगाचे औचित्य साधून अमृत भारत योजनेच्या प्रस्तावित टप्प्यात भंडारा व तुमसर या दोन्ही रेल्वे स्थानकांचाही समावेश करण्यात यावे असे निवेदनही केंद्रीय रेल्वे मंत्री व रेल्वे राज्यमंत्री यांना केले आहे.

उल्लेखनिय असे की, खा. प्रफुल पटेल यांच्या पाठपुराव्याने अमृत भारत योजनेत गोंदिया रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यात आला. तसेच गोंदिया रेल्वे स्थानकाचे सौंदर्यीकरण व इतर समस्या मार्गी लावण्याच्या उद्देशाने सुचविलेल्या ३०.९६ कोटीच्या कामांना मंजुरीही प्रदान करण्यात आली हे विशेष.

Related posts