सरपंच नरेंद्र चौरागडे यांच्या पुढाकाराने मोहाडी येथे पाच लक्ष रूपये चे सिमेंट रस्ता बांधकामाचे भुमिपुजन संपन्न…

376 Views

गोरेगाव -26 जुलै
तालुक्यातील मोहाडी ग्रांम पंचायत येथे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांच्या पुढाकाराने विविध विकासकामे जोमात सुरू आहेत त्यांतच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मोहाडी येतील श्री तुकाराम भोयर यांच्या घरापासून ते सेवकराम येळे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम पाच लक्ष रूपये बांधकामाचे भूमिपूजन गोंदिया जिल्हा परिषद सदस्य डॉ लक्ष्मनजी भगत यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहाडी ग्रांम पंचायत चे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे होते प्रमुख अतिथी गोरेगाव पंचायत समिती सदस्य रामेश्वर माहारवाडे, उपसरपंच मोहनलाल पटले, तंन्टामुक्ती गांव समिती अध्यक्ष लिखीराम बघेले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक जे जे पटले, मोहाडी चे उद्दोगपती कमलेश पटेल, सेवानिवृत्त शिक्षक वाय एफ पटले, सामाजिक कार्यकर्ता प्रमानंद तिरेले, मोहाडी ग्रांम पंचायत चे माजी सरपंच धुर्वराज पटले,माजी उपसरपंच श्रीराम पारधी ग्रांम पंचायत सदस्य भिवराज शेंडे, योगराज भोयर, खेमराज वाकले,प्रभा पंधरे, चंन्द्रकांता पटले, पुस्तकला पटले, पुजा डोहाळे,नेहा उके,योग शिक्षक योंगेन्द्र बिसेन, वाल्मिकी बिसेन,सेवकराम येळे, सिताराम भोयर,राजा कटरे, रोजगार सेवक चेतेश्वरी पटले, शिवराम मोहनकार,चुळामन पटले आदी मान्यवर, गांवकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमांचे संचालन व आभार ग्रांम पंचायत मोहाडी चे सचिव पी बी टेंभरे यांनी केले.

Related posts