रस्त्याने जात असताना, चालत्या स्कुटीला आग गाडी जळून खाक…

619 Views

प्रतिनिधी। 20 जुलाई
तिरोडा । आज सकाळी सव्वा दहा वाजता शिंगाडा तलाव काठावरिल रस्त्याने जात असताना स्कुटीला आग लागून गाडी जळून खाक झाली.


शास्त्री वार्ड तिरोडा निवासी सौ. नूतन सुकलाल बिसेन या जिल्हा परिषद शाळा विहिरीगाव येथे शिक्षिका असून त्या आपल्या पतीसोबत शाळेकडे शिंगाडा तलाव काठावरील रस्त्याने जात असताना स्कुटीतून धूर निघू लागला. ते गाडी तिथेच सोडून ते बाजूला झाले. गाडीने पेट घेतला व पूर्ण जळून खाक झाली. सुदैवाने दोघेही सुखरूप वाचले.

Related posts