तिरोड़ा: दोन मोबाईल चोर पोलिसांच्या ताब्यात – १६ मोबाईलफोन जप्त…

128 Views

 

तिरोडा (दि. १८) – तिरोडा पोलिसांनी दोन मोबाईल चोरांना अटक केली असून त्यांच्याकडून १६ मोबाईल फोन जप्त केले आहे.

रोहित सत्यवान डोंगरे (२०) वय 20 रा. नेहरू वॉर्ड तिरोडा व उत्कर्ष उर्फ छोट्या महेंद्र रामटेके (१९) रा. जगजीवन वार्ड तिरोडा अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत.

त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या १६ मोबाईलफोनची अंदाजे किंमत २ लाख ४५ हजार एवढी आहे. दोन्ही आरोपीवर भा दं वि ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने २० तारखे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

सदर कारवाई उपविभागीय अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात, पोलीस निरीक्षक देविदास कठाडे यांच्या नेतृत्वात तपास अधिकारी हवालदार नितेश बावणे आणि त्यांचे सहकारी पोलीस श्रीरामे, खराबे, शेंडे यांनी केली.

Related posts