गोंदिया: 25 जुलै पर्यंत जिल्ह्यात कलम 37 (1) (3) चे मनाई आदेश लागू..

420 Views

      गोंदिया, दि.11 :- जिल्ह्यात 11 ते 25 जुलै 2023 या कालावधीत विविध पक्ष व संघटनांकडून त्यांच्या प्रलंबीत मागण्यासंदर्भाने उपोषणे, धरणे, मोर्चे, रास्तो रोको, जेल भरो व संप इत्यादी आंदोलने आयोजित केली जात आहेत.

तसेच दिनांक 20 ते 29 जुलै 2023 पर्यंत ‘मोहरम’ असून सदर सण/उत्सवाचे पार्श्वभूमीवर जिल्ह्यात होणाऱ्या असामाजिक तत्वांचे कृत्त्यास/घटनांना आळा घालण्याकरीता जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने दिनांक 11 जुलै पासून ते 25 जुलै 2023 पर्यंत सन 1951 च्या मुंबई पोलीस अधिनियमाची कलम 37 (1) (3) चे मनाई आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी लागू केले आहे.

सदर अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर फौजदारी नियमाअंतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

Related posts