आलापल्ली येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा नेशनल आदिवासी पीपल फेडरेशन गोंदियाच्या वतीने निषेध

150 Views

 

त्या दोन्ही आरोपीवर कठोर कारवाही करण्यात यावी- पीपल जिलाध्यक्ष करण टेकाम

गोंदिया :: एटापल्ली तालुक्यातील आदिवासी समुदायातील अल्पवयीन मुलगी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र घेण्यासाठी गेली असता आलापल्ली येथे दोन युवकांनी सामूहिक अत्याचार केला याचा नेशनल आदिवासी पीपल फेडरेशन गोंदियाच्या वतीने गोंदिया जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आला सोबतच दोन्ही आरोपीवर कठोर कारवाही करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली.


गडचिरोली जिल्ह्यातील महिलांच्या अत्याचाराच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात पूर्णतः उदासीन आहे. दिवसागणिक जिल्ह्यातील महिलांच्या अत्याचाराच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे , आता तरी सरकारने आणि प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन महिलांच्या सुरक्षा करिता ठोस पावले उचलावी अशी मागणी सुद्धा यावेळी नेशनल आदिवासी पिपल फेडरेशनने केली .

गोंदिया जिल्हा अधिकारी यांना निवेदन देताना प्रामुख्याने नेशनल आदिवासी पीपल फेडरेशन केंद्रीय सचिव मा. दुर्गाप्रसाद कोकुडे, पीपल फेडरेशन जिल्हा अध्यक्ष करण टेकाम सचिव नीलकंठ चिचाम , महिला उपाध्यक्ष संगीता पुसाम, चत्रुघन मरकोल्हे , पी.बी. टेकाम, हेमंत पंधरे, रंजना उईके, दिलेश्वरी मर्सकोल्हे, मनीष पुसाम, चंद्रशेखर वाढवे माजी पं. स. सदस्य, प्रशांत सिडाम सह इतर महिला आणि नागरिक यावेळी उपस्थित होते.

Related posts