कार्यकर्त्यानी जनतेशी कौटुंबिक नाते निर्माण करून पक्षाला बळकट करावे – माजी आमदार राजेंद्र जैन

186 Views

 

मोरगाँव अर्जुनी, सडक/अर्जुनी येथे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक संपन्न

 

गोंदिया। अर्जुनी/मोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक अर्जुनी/मोर स्थित कृषी उत्पन्न बाजार समिती येथे माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष  गंगाधर परशुरामकर, नरेश माहेश्वरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

खासदार प्रफुल पटेल यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष पदी निवड झाल्याबाबद्दल तालुक्याच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. या बैठकीत खा.  प्रफुल पटेल साहेबांचा सत्कार, नव्याने बूथ कमेटी तयार करणे व अन्य महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन म्हणाले की, खा. प्रफुल पटेल यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष पदी निवड झाल्याबाबद्दल आगामी काळात सत्कार समारंभ आयोजित करण्यात येणार आहे या सोहळ्याला यशस्वी करण्याची जबाबदारी आपण सर्वांची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन बांधण्यासाठी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यानी जनतेशी कौटुंबिक नाते निर्माण करावे. संघटनेत नियोजनबद्ध पद्धतीने कार्य केल्यास निश्चितच यश प्राप्त होते. निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या जोरावरच जिंकता येतात. म्हणून पक्षात संघटनेची व बूथ कमिटीचे सशक्तीकरण करणे गरजेचे आहे असे प्रति[पादन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी केले.

आपसी मतभेद विसरून बूथ कमेटीची सर्वसमावेशक कार्यकारिणी तयार करण्याची जबाबदारी प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांनी घ्यावी असे जिल्हाध्यक्ष  गंगाधर परशुरामकर यांनी प्रतिपादन केले. जिल्हाध्यक्ष परशुरामकर यांच्या आदेशाने अर्जुनी मोर तालुक्यातील जिल्हा परिषद निहाय्य बूथ कमेटी प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, गंगाधर परशुरामकर, नरेश माहेश्वरी, यशवंत गणवीर, लोकपाल गहाणे, यशवंत परशुरामकर, भोजराम रहेले, राकेश जयस्वाल, दाणेश साखरे, किशोर ब्राह्मणकर, नारायण भेंडारकर, नामदेव डोंगरवार, हिरालाल शेंडे, सुशीला हलमारे, किरणताई कांबळे, आम्रपाली डोंगरवार, योगेशभाऊ नाकाडे, उद्धव मेहंदळे, मोरेश्वर रहेले, हेमकृष्ण संग्रामे, रतिराम राणे, डॉ दीपक रहेले, शालिकराम हातझाडे, नरेंद्र बनपुरकर, दिलीप लाडेकर, नीलकंठ हुमणे, आर के जांभुळकर, संजय ईश्वर, आकाश ठवरे, मोहन साखरे, शिवलाल वाघमारे, यशवंत शहारे, योगराज हलमारे, विनायक मस्के, प्रशांत नाकाडे, सोमदास गणवीर, बाबुलाल नेवारे, सुरेश खोब्रागडे, विनोद सहारे, अजय सहारे, प्रेमलाल नागपुरे, सर्वेश धांडे, लेकराम कापगते, भगवान मस्के, नानाजी पिंपळकर, प्रमोद डोंगरे, देवानंद नंदेश्वर, श्रावण मेंढे, किशोर आसाराम ब्राह्मणकर, कांतीलाल डोंगरवार, स्नेहा टेम्भूर्णे, विलास टेम्भूर्णे, उषा वाढई, वनिता मेश्राम, कुंदा भोयर, निषाताई मस्के, शालू बनपुरकर, संगीता कापगते, हर्ष राऊत, अनिशा पठाण, सुनीता जायस्वाल, माधुरी बनपूरकर, माधुरी पिंपळकर, विलास रामटेके, रौनक ठाकूर सहित मोठ्या संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.-


सडक/अर्जुनी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक संपन्न

गोंदिया। सडक/अर्जुनी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक कोहमारा स्थित एरिया 51 येथे माजी आमदार श्री राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष श्री गंगाधर परशुरामकर, जिल्हा बूथ प्रमूख श्री नरेश माहेश्वरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. बैठकीत खा.श्री प्रफुल पटेलजी यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष पदी निवड झाल्याबाबद्दल तालुक्याच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. सोबतच आगामी काळात सत्कार समारंभ आयोजित करण्यात येणार आहे या सोहळ्याला यशस्वी करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. सोबतच पक्ष संघटनेवर चर्चा करून नव्याने बूथ कमेटी तयार करणे व बूथ कमिटीमध्ये युवकांना व महिलांना प्राधान्याने स्थान देणे, पक्ष वाढीकरिता संघटनेला मजबूती प्रदान करणे याबाबद पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, गंगाधर परशुरामकर, नरेश माहेश्वरी, अविनाश काशिवार, रमेश चुर्हे, सौ.सुधा रहांगडाले, डॉ रुकीराम वाढई, डॉ अजय लांजेवार, डी यु रहांगडाले, शिवाजी गहाणे, मंजुषा डोंगरवार, रजनी गिऱ्हेपुंजे, वंदना थोटे, छाया मरस्कोल्हे, अनिता बांबोळे, उमराव मांढरे, देवाजी बनकर, विजय मेश्राम, खिलोज दोनोडे, ईश्वर कोरे, ओमराज दखने, चंद्रशेखर चांदेवार, मुकेश कोरे, देवानंद कोरे, डॉ सेवकराम रहांगडाले, नीरज मेश्राम, केदार चव्हाण, रतनभाऊ डोंगरवार, नरेश मौजे, नामदेव डोंगरवार, मुन्ना बोरकर, शामराव वासनिक, दामोधर बोपचे, रंगलाल पटले, राजेंद्र आरसोडे, राहुल मेश्राम, भूमेश्वर राणे, रमेश करचाल, प्रदीपकुमार मेश्राम, दिनेश कोरे, दुर्योधन मरस्कोल्हे, शामराव गेडाम, आस्तिक परशुरामकर, भोलानाथ कापगते, मुनेश्वर कापगते, ओमप्रकाश टेम्भूर्णे, राजेश फुले, उमेश कापगते, अमीन शेख, घनश्याम गजबे, प्रशांत बालसमावर, नरेश कापगते, अफरोज शेख, चंदूभाऊ बहेकार, दिलीप कापगते, भागवत झिंगरे, राहुल यावलकर, कृष्णा ठलाल, जगन्नाथ लंजे, विलास लंजे, दिलीप वैद्य, अनिल भेंडारकर, रामकृष्ण नान्हे, मंगेश नागपुरे, सत्यवान नेवारे, महेश बोरकर सहित मोठ्या संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Related posts