गोंदिया: घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास एलसीडी टीव्ही सह अटक, स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कामगिरी 

394 Views
क्राइम रिपोर्टर।
गोंदिया। गेल्या 29 जून रोजी घराला कुलुप लाऊन दुर्ग छत्तीसगढ येथे सासुरवाडी ला गेले फिर्यादि राजेश गणेश भिमकर, वय 54 वर्षे, रा.राजाभोज कॉलोनी रिंगरोड, गोंदिया, ( नौकरी, रेल्वे स्टेशन मास्टर) 11 जून ला घरी परत आलेल्या वरुन कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घराचे समोरील दाराचा कुलूप तोडुन शो-केस मधील एलसीडी टी.व्ही. सोनी कंपनीची 49 इंची ची किंमत 62,000/- रु ची चोरून नेल्याने फिर्यादी यांचे तक्रारीवरून पो.स्टे. रामनगर येथे गु.र.न.155/ 2023 कलम 454, 457, 380, भादवी अन्वये अज्ञात चोरट्या विरूद्ध  गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
 वरिष्ठांचे निर्देशांप्रमाणे व मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया यांचे मार्गदर्शनात स्थानीक गुन्हे शाखा पथक चोरी, घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध करीत असताना पथकास गोपनीय बातमीदार कडून माहिती मिळाली की, ईसंम नामे विकास ऊर्फ कालू बुराडे रा.विजयनगर, कटंगी कला याने काही दिवसा पूर्वी मोठी टी.व्ही.चोरी केली असून विक्री करणार आहे.
अश्या प्राप्त खात्री शिर माहितीच्या आधारे घरफोडी करणारा गुन्हेगार नामे विकास उर्फ कालू बळीराम बुराडे वय 25 वर्षे रा. विजयनगर, कटंगी कला गोंदिया यास त्याचे राहते पत्त्यावरून ताब्यात  घेण्यात आले.
पो.स्टे. रामनगर दाखल अप. क्र.155/2023 मधील एलसीडी टीव्ही चोरी बाबत विचारपूस केली असता त्याने सदर गुन्ह्यांतील चोरीस गेलेली एलसीडी टीव्ही चोरी केल्याचे कबूल केले. त्यांचे ताब्यातून गुन्ह्यात चोरी केलेली सोनी कंपनीची एल.सी.डी. टि.व्ही.49 इंच किं.62,000/- रुपयाची गुन्ह्यात हस्तगत करण्यात आली आहे.
आरोपीस पो.स्टे. रामनगर पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत असून आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याचे पासून रामनगर परिसरातील आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे निर्देशांप्रमाणे व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनात स.फौ. अर्जुन कावळे, पो.हवा. राजेंद्र मिश्रा, महेश मेहर, भुवनलाल देशमुख, चित्तरंजन कोडापे, संतोष केदार यांनी केलेली आहे.

Related posts