गोंदिया: इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षा मध्ये समाजकल्याण विभागाच्या तिन्ही निवासी शाळेच्या 100 टक्के निकालाची परंपरा कायम

386 Views

 

गोंदिया/प्रतिनिधी:- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग पुणे च्या वतीने राज्यात 100 शासकीय निवासी शाळा चालविल्या जातात. त्यापैकी मा. सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय गोंदिया च्या अंतर्गत जिल्ह्यात 3 निवासी शाळा कार्यरत आहेत. त्यामध्ये गोंदिया तालुक्यात नंगपुरा मूर्री येथे मुलांची निवासी शाळा आहे. सड़क अर्जुनी तालुक्यात डव्वा येथे मुलींची निवासी शाळा आहे. तर तिरोडा तालुक्यात सरांडी येथे मुलींची निवासी शाळा आहे. विशेष म्हणजे या निवासी शाळा SC/ST/NT/SBC या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असून या शाळेतील विद्यार्थी ग्रामीण भागातून आलेले असतात. कुठल्याही प्रकारची अतिरिक्त शिकवणी वर्ग न लावताही दरवर्षी या तिन्ही निवासी शाळांचा दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला आहे. अशाप्रकारे दरवर्षीप्रमाणे उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत या वर्षी देखील तिन्ही निवासी शाळेचा इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षा मार्च 2023 चा निकाल 100 टक्के लागला आहे. ही बाब समाजकल्याण विभागासाठी गौरवास्पद आहे.

दरम्यान अनु.जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा,नंगपुरा मूर्री येथील एकूण 24 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी 8 विद्यार्थी हे प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले असून 16 विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या शाळेतून पार्थिक देवेंद्र डहाट 89.20% गुण प्राप्त करून प्रथम आला आहे. चैतन्य नितेश सहारे 85.60% गुण प्राप्त करून द्वितीय आला आहे. तर संकल्प रंजित बनसोड 85.00% गुण प्राप्त करून तृतीय आला आहे.

अनु.जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा,डव्वा येथील एकूण 24 विद्यार्थीनी परीक्षेला बसल्या होत्या, त्यापैकी 14 विद्यार्थीनी ह्या प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाल्या असून 9 विद्यार्थीनी ह्या प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. तर 1 विद्यार्थिनी ही द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे.

या शाळेतून कु. दिव्यशिला नागसेन भैसारे 88.60% गुण प्राप्त करून प्रथम आली आहे. कु. निगम महेंद्र बोंबार्डे 88.40% गुण प्राप्त करून द्वितीय आली आहे. तर कु. वैशाली भारत धानगूण 86.40% गुण प्राप्त करून तृतीय आली आहे.

अनु.जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा,सरांडी येथील एकूण 23 विद्यार्थीनी परीक्षेला बसल्या होत्या, त्यापैकी 16 विद्यार्थीनी ह्या प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाल्या असून 6 विद्यार्थीनी ह्या प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. तर 1 विद्यार्थिनी ही द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे.

या शाळेतून कु. स्पर्श सचिन डाेंगरे 90.20% गुण प्राप्त करून प्रथम आली आहे. तसेच जिल्ह्यातील तिन्ही निवासी शाळेतून प्रथम येण्याचा मानमिळविला आहे. कु. तेजस्वी विलास शेंडे 86.60% गुण प्राप्त करून द्वितीय आली आहे. तर कु.नम्रता याेगेन्द्र टेंभेकर 84.40% गुण प्राप्त करून तृतीय आली आहे.

या तिन्ही निवासी शाळेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे समाजकल्याण गोंदियाचे सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे, निवासी शाळा मूर्रीचे मुख्याध्यापक रविशंकर ईठूले सर, निवासी शाळा डव्वाच्या मुख्याध्यापिका श्रीमती संध्या दहिवले मॅडम, निवासी शाळा सरांडीचे मुख्याध्यापक धारेन्द्र आंबिलकर सर, तसेच तिन्ही निवासी शाळेचे गृहपाल, सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या सर्व मार्गदर्शक शिक्षकांना दिले आहे.

Related posts